Pune Bh​AU Flex Kadha Campaign Pmc Targets Illegal Flex Banner saam tv
मुंबई/पुणे

अतिक्रमण हटावनंतर पुण्यात ‘भाऊ फ्लेक्स काढा’ मोहीम; मनपाकडून पुणे विद्रुपीकरणाचा पुरस्कार जाहीर

'Bhau Flex Kadhha' Campaign: आता बातमी आहे पुणे मनपाच्या अनोख्या पुरस्काराची, अतिक्रमणविरोधी कारवाईनंतर पुणे महापालिकेनं आता अनधिकृत फ्लेक्सकडे आपला मोर्चा वळवलाय. यासाठी महापालिकेनं थेट पुरस्काराची घोषणा केलीय. विशेष म्हणजे पहिला पुरस्कारही जाहीर करण्यात आलाय. काय आहे ही भाऊ फ्लेक्स काढा मोहीम? पहिला पुरस्कार कोणत्या नेत्याला मिळाला? पाहूयात हा विशेष रिपोर्ट.

Rohit Kadam

  • पुणे महापालिकेची भाऊ फ्लेक्स काढा मोहीम नेमकी काय आहे?

  • पुणे शहरातील बेकायदेशीर फ्लेक्स आणि होर्डिंगवर महापालिकेची कारवाई

  • अनधिकृत राजकीय फ्लेक्स हटवण्यासाठी पुणे मनपाची नवी मोहीम

पुण्यातील रस्ते चकाचक केल्यानंतर आता महापालिका आयुक्तांनी शहराला विद्रुप करणाऱ्या बॅनर आणि फ्लेक्सकडे मोर्चा वळवलाय. नेतेमंडळींच्या फ्लेक्समुळे पुणं पार विद्रुप झालंय. आणि हेच विद्रुपीकरण रोखण्यासाठी पुणे महानगरपालिकेनं अनोखा फंडा शोधलाय. शहरात नाक्या नाक्यावर. चौका-चौकावर फ्लेक्स लावणाऱ्यांना महापालिकेकडून शहर विद्रुपीकरण पुरस्कार देण्यात येतोय. आणि तुम्हाला पहिल्या पुरस्काराच्या मानकरीचे नाव सांगितले तर धक्का बसल्याशिवाय राहणार नाही.

पुणे विद्रुपीकरणाचा पहिला पुरस्कार चक्क महापालिकेचेच स्थायी समितीचे अध्यक्ष असलेले भाजपचे श्रीनाथ भिमाले यांनी पटकावलाय. विशेष म्हणजे त्यांच्या वाढदिवसालाच त्यांना या मानाच्या पुूरस्काराचं गिफ्ट मिळालंय. एव्हढच नव्हे तर अतिक्रमणविरोधी आंदोलन करणारे नगरसेवक सुनील पांडे आणि पृथ्वीराज सुतार यांनीही या स्पर्धेत मानाचं स्थान पटकावलंय़.

स्थायी समितीचे अध्यक्ष आणि पहिल्या पुरस्काराचे मानकरी भिमालेंनी मात्र आपल्या वाढदिवसाचंच कारण पुढं करत फ्लेक्सबाबत सारवासारव करण्याचा प्रयत्न केलाय. शहरातील चौक, रस्ते आणि सार्वजनिक ठिकाणी वाढदिवस, स्वागत, नियुक्त्या आणि विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणात अनधिकृत फ्लेक्स लावले जातात. या आळा घालण्यासाठी महापालिकेनं ‘भाऊ फ्लेक्स काढा ही मोहीम सुरू केली. यासाठी स्वतंत्र वेबसाईट सुरू करण्यात आली. पुणेकरांनीही फ्लेक्सचे फोटो काढून या वेबसाईटवर अपलोड करण्यात मोठा पुढाकार घेतलाय. त्यामुळे नेत्यांची चांगलीच अडचण झालीय.

पोर्टलवर पहिल्याच दिवशी नागरिकांनी 150 हून अधिक अनधिकृत फ्लेक्सचे छायाचित्रे महापालिकेकडे पाठविली आहेत. विशेषतः सत्ताधारी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या फ्लेक्सविरोधात सर्वाधिक तक्रारी महापालिकेकडे आलेल्या आहेत. या पोर्टलवर नागरिकांना अनधिकृत फ्लेक्सचे छायाचित्र अपलोड करता येते. त्यानुसार संबंधित विभाग आणि वॉर्ड ऑफिसमार्फत कारवाई केली जाणार आहे.

पोर्टलवर पहिल्याच दिवशी नागरिकांनी 150 हून अधिक अनधिकृत फ्लेक्सचे छायाचित्रे महापालिकेकडे पाठविली आहेत. विशेषतः सत्ताधारी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या फ्लेक्सविरोधात सर्वाधिक तक्रारी महापालिकेकडे आलेल्या आहेत. या पोर्टलवर नागरिकांना अनधिकृत फ्लेक्सचे छायाचित्र अपलोड करता येते. त्यानुसार संबंधित विभाग आणि वॉर्ड ऑफिसमार्फत कारवाई केली जाणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Gang War: पुण्याचं होतंय 'गँग्ज ऑफ वासेपूर'; गोळ्या झाडून मेला नाही म्हणून कोयत्यानं वार

दारूड्यांसाठी सरकारची अनोखी योजना; दारू पिण्याआधी होणार मेडिकल टेस्ट

Vaibhav Suryavanshi: क्रिकेटचं ऐतिहासिक 'वैभव' परतलं; वैभव सूर्यवंशीच्या 52 चेंडूत 204 धावा

Thursday Horoscope: आज 3 राशींच्या आयुष्यात घडणार आनंददायी बदल, तर काहींना कामाच्या ठिकाणी नव्या आव्हानांचा सामना करावा लागणार

हृदयविकार, BP, डाय़बेटीजची बनावट औषधं; FDA कडून बनावट कारखान्याचा पर्दाफाश

SCROLL FOR NEXT