Pune Bridge Saam tv
मुंबई/पुणे

Pune Bridges: पुण्यातील ओढे-नाले, कालव्यांवरील पुलांचे होणार "स्ट्रक्चरल ऑडीट", सुरक्षेच्या दृष्टिकोनातून होणार पाहणी

Bridge in Pune City: भविष्यातील धोके टाळण्याच्या उद्देशाने पुणे महानगरपालिका शहरातील ओढे-नाले, कालव्यांवरील पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याचा निर्णय घेतला आहे.

Saam Tv

Pune Bridges: पुणे महानगरपालिकेद्वारे शहरातील विविध भागांमध्ये असलेल्या ओढे-नाले आणि कालव्यांवर पूल बांधण्यात आले. पण या पुलांची पाहणी झालेली नाही. शहरातील पुलांची सद्य:स्थिती कशी आहे, त्यांमध्ये काय सुधारणा करणे अपेक्षित आहे हे जाणून घेण्यासाठी महानगरपालिकेद्वारे संबंधित पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट केले जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.

पुणे शहरात आंबील ओढा, भैरोबा नाल्यासह अनेक मोठे नाले-ओढे आहेत. मुठा कालवा शहरातून ग्रामीण भागामध्ये जातो. काही वर्षांपूर्वी महानगरपालिका प्रशासनाकडून छोटे-मोठे पूल तयार करण्यात आले. या पुलांमधून वाहतुकीची मोठी सोय झाली. अनेक पूल हे नागरी वाहतुकीसाठी महत्त्वपूर्ण आहेत. तरी यातील काही पूल हे जुने झाले आहेत. अशा जुन्या पुलांची स्थिती कशी आहे? ते प्रवासासाठी अनुकूल आहेत ना? त्यांची अवस्था कशी आहे? याची पाहणी महानगरपालिकेद्वारे होणार आहे. स्ट्रक्चरल ऑडीटनंतर पुढे त्यावर काम केले जाईल.

यावर पुणे महानगरपालिका विशेष प्रकल्प विभागाचे प्रमुख अभियंता युवराज देशमुख यांनी माहिती दिली. ते म्हणाले, "ओढे-नाले, कालव्यांवरील सर्व पूल सध्या वाहतुकीसाठी खुले आहेत. पण त्यांची सध्याची स्थिती जाणून घेणे आवश्यक आहे. स्थिती खराब असल्यास संबंधित पुलाची डागडुजी केली जाईल. भविष्यातील धोके टाळण्याच्या दृष्टीने सर्व पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट केले जाणार आहे."

नदीवरील ३८ पैकी ११ पुलांचे काम पूर्ण; उर्वरित काम दुसऱ्या टप्प्यात होणार.

दोन वर्षांपूर्वी महानगरपालिकेने नदीवरील ३८ पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट केले होते. .यासाठी पालिका प्रशासनाने ३५ कोटी रुपयांची तरतूद केली होती. एकूण ३८ पुलांपैकी ११ पुलांचे काम आतापर्यंत पूर्ण झाले आहे. उर्वरित २७ पुलांच्या कामासाठी अंदाजपत्रकात तरतूद केली जाणार आहे. दुसऱ्या टप्प्यामध्ये पुलांचे काम होणार असून त्यासाठीच्या निविदा प्रक्रिया सुरु केली जाणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Aamir Khan: 'गौरी हिंदू नाही..., माझ्या कोणत्याही पत्नीने धर्मांतर केलं नाही', 'लव्ह जिहाद'च्या आरोपांवर आमिर खानचं स्पष्टीकरण

Maharashtra News Live Update: सर्व शेतकऱ्यांसाठी सरसकट २ लाखांची कर्जमाफी - मुख्यमंत्री

Weight loss plan: 1 महिन्यात कमी करा 5 ते 7 किलो वजन कमी; तज्ज्ञांनी सांगितला सोपा डाएट आणि फिटनेस प्लॅन

Sex Racket Bust : स्पा सेंटरच्या आडून सुरु होती देह विक्री, ६ महिला आणि २ पुरुष नको त्या अवस्थेत; पोलिसांनी दार उघडलं अन्...

51 कर्मचारी-अधिकाऱ्यांवर मोठी कारवाई! प्रशासकीय वर्तुळात खळबळ; महापालिकेत नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT