Pune Muncipal Corporation, ACB, Bribe Saam Tv
मुंबई/पुणे

Pune News : ३० हजार रुपयांच्या लाचप्रकरणी पुणे महापालिकेच्या आरोग्य निरीक्षकाला अटक

ही कारवाई महापालिकेच्या नगर रोड (वडगाव शेरी) क्षेत्रीय कार्यालयात करण्यात आली.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Pune Crime News : एसीबीने पुणे (pune acb) महापालिकेच्या (pune muncipal corporation) आरोग्य निरीक्षकाला (health officer) ३० हजार रुपयांच्या लाच प्रकरणी पकडले आहे. संबंधित कर्मचा-याला अटक (arrest) करण्यात आली आहे. या घटनेमुळे पालिकेत एकच खळबळ उडाली आहे. (Maharashtra News)

ही कारवाई महापालिकेच्या नगर रोड (वडगाव शेरी) क्षेत्रीय कार्यालयात करण्यात आली. सचिन धर्मा गवळी (वय ३४) या आरोग्य निरीक्षकाने एका बिगारी मुकादमास ३० हजार रुपयांची लाच मागितल्याची तक्रार त्याने नाेंदवली हाेती. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी (ता. २७) सापळा रचून गवळी याच्यावर कारवाई केली.

गवळी हे नगर रोड (वडगाव शेरी) क्षेत्रीय कार्यालयातील घनकचरा व्यवस्थापन- आरोग्य विभागात आरोग्य निरीक्षक आहेत. तर, तक्रारदार हे त्याच कार्यालयात बिगारी मुकादम म्हणून काम करतात.

गवळी याने या क्षेत्रीय कार्यालयातून बदली न करण्यासाठी तक्रारदाराकडे ३० हजार रुपये लाचेची मागणी केली होती. याबाबत मुकादमाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पुणे विभागाकडे तक्रार दिली.

या तक्रारीची पडताळणी केली असता त्यात गवळी याने स्वत: आणि वरिष्ठांसाठी लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार गुन्हा दाखल करून गवळी याला अटक केली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पुणे विभागाचे पोलिस अधीक्षक अमोल तांबे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक सूरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. पुढील तपास पोलिस निरीक्षक प्रवीण निंबाळकर करत आहेत.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Weather update: देशावर यंदा दुष्काळाचं सावट,जागतिक हवामान संघटनेच्या अंदाजानं शेतकऱ्यांचं टेन्शन वाढलं

Fact Check: खरंच सरकारनं गॅस सिलिंडरचा पुरवठा बंद केला? जाणून घ्या व्हायरल मेसेजमागचं सत्य

Maharashtra Live News Update: श्रीरामपूरमध्ये हॉटेलवर छापा; घरगुती गॅस सिलिंडरचा गैरवापर उघड, 10 सिलिंडर जप्त

ICC Ranking : टी २० रँकिंगमध्ये वर्ल्डकप जिंकणाऱ्या भारताचा दबदबा; संजू सॅमसननं घेतली मोठी झेप, टॉप १० मध्ये कोण-कोण?

Solapur Crime: सूनेमुळे सासऱ्यानं संपवलं जीवन; तपासात समोर आलं धक्कादायक कारण

SCROLL FOR NEXT