Pune MNS Saam TV
मुंबई/पुणे

पुण्यात मनसेला दिलासा; वसंत मोरे यांचे कट्टर समर्थक पुन्हा पक्षात परतणार

15 दिवसांपूर्वी पंजाबी यांनी मनसेतून शिवसेनेत प्रवेश केला होता

साम टिव्ही ब्युरो

पुणे : राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या पुण्यातील सभेआधी (Pune Sabha) मनसेला एक मोठा दिलासा मिळाला आहे. वसंत मोरे (Vasant More) यांचे कट्टर समर्थक शहाबाज पंजाबी (Shahbaz Punjabi) यांनी काही दिवसांपूर्वी पक्षाला सोडचिठ्ठी दिली होती. 15 दिवसांपूर्वी पंजाबी यांनी मनसेतून शिवसेनेत प्रवेश केला होता. आता पुन्हा एकदा पंजाबी मनसेत प्रवेश करणार असल्याची माहिती आहे. येत्या रविवारी (22 मे) मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत ते मनसेमध्ये प्रवेश करणार असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.

अगदी 15 दिवसांपूर्वी शहाबाज पंजाबी यांनी मनसेला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत प्रवेश केला होता. शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या उपस्थितीत त्यांनी हाती शिवबंधन बांधलं होतं. मात्र आता पुन्हा एकदा ते घरवापसी करणार असल्याची माहिती मनसेच्या सूत्रांनी दिली आहे. पंजाबी हे मनसेचे पुणे शहराचे माजी अध्यक्ष वसंत मोरे यांचे कट्टर समर्थक आहेत. शहबाज पंजाबी हे मनसे शहर वाहतूक सेनेचे उपाध्यक्ष होते.

मनसेने हनुमान चालीसासंदर्भात आंदोलन जाहीर केल्यानंतर कोंढवा परिसरात हनुमान चालीसा लावू देणार नाही असे वक्तव्य शहाबाज पंजाबीने केले होते. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्यांबाबत आपली भूमिका जाहीर केल्यानंतर ज्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले त्यांमध्ये पंजाबी यांचाही समावेश होता. मनसेने जर हनुमान चालीसा लावला, तर आमची मुले तयार आहेत, असे वक्तव्यही पंजाबीने केले होते.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : राज्यसभेत अमित शहांना बोलवा - मल्लिकार्जुन खर्गे

Shiv Sena Live Update : शिवसेना कुणाची? धनुष्यबाण कुणाचा? कोर्टातून आली महत्त्वाची अपडेट

Maharashtra Politics : उद्धव ठाकरेंविरोधात संजय राऊतांच्या हॉटेलमध्ये बैठका; खासदाराच्या दाव्यानं राजकारणात खळबळ

Auto Taxi Marathi Rule : मराठी आलं नाही तर लायसन होणार रद्द! आज येणार शासनाचा मोठा निर्णय; परिवहन मंत्र्यांची माहिती

Society Rule : सोसायटीत जिम अन् स्विमिंग पूलचे वेगळे पैसे घेतले जातायत? मग ही बातमी नक्की वाचा, तुमचे हक्क काय सांगतात

SCROLL FOR NEXT