MNS Chief Raj Thackeray Saam Tv
मुंबई/पुणे

आज पुण्यात 'राज'गर्जना! राज ठाकरेंच्या निशाण्यावर कोण?

आज सकाळी 10 वाजता ही सभा गणेश कला क्रीडा मंच सभागृहात होणार आहे.

Shivani Tichkule

पुणे - मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज पुण्यात सभा होणार आहे. आज सकाळी 10 वाजता ही सभा गणेश कला क्रीडा मंच सभागृहात होणार आहे. स्वारगेट परिसरातील बंदीस्त सभागृहात या सभेचे आयोजन करण्यात आले आहे. राज ठाकरे (Raj Thackeray) गेल्या काही दिवसांपासून राज्य सरकारवर आपली तोफ डागत आहे. त्यामुळे आजच्या या सभेत राज ठाकरे काय बोलणार याकडे सर्व्यांचे लक्ष लागलेले आहे. सुरक्षेच्या कारणास्तव या परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते येण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. सोबतच आगामी निवडणुकांच्या संदर्भात देखील राज ठाकरे हे कार्यकर्त्यांशी संवाद साधण्याची शक्यता आहे.

हे देखील पाहा -

राज ठाकरे यांच्या या सभेसंदर्भात संभ्रम निर्माण झाला होता. या सभेबाबात बाळा नांदगावकर यांच्यासोबत राज ठाकरे यांनी बैठक घेतली होती. या बैठकीनंतर बाळा नांदगावकर यांनी सांगितलं होतं की, नदीपात्रात सभा होणार होती मात्र हवामान खात्याचा अंदाज पाहता आता पाऊस कधीही येऊ शकतो आणि अचानक पाऊस आला तर हजारो लोकांना त्रास होईल. यामुळे ही सभा 21 ऐवजी 22 मे रोजी गणेश कला क्रीडा मंच इथे घेण्याचा निर्णय घेण्यात आला.

दरम्यान, राज ठाकरे यांची ही सभा गेल्या तीन सभांसारखीच वादळी ठरण्याची शक्यता आहे. कारण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची काही दिवसांपूर्वीच बीकेसीत सभा पार पडली या सभेत त्यांनी राज ठाकरेंना पिक्चरमधल्या मुन्नाभाईची उपमा देत टोला लगावला होता. तर काहींना बाळासाहेब झाल्यासारखे वाटते कधी मराठीवर बोलतात. कधी भगवी शाल घेवून फिरतात असं म्हणत राज ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली होती. त्यामुळे राज ठाकारे या मुद्द्यावर काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs IRE: बेलफास्टमध्ये टीम इंडियाचा सुफडासाफ; आयर्लंडचा ऐतिहासिक विजय

केतन अग्रवाल हत्या प्रकरण नवी अपडेट: पोलिसांच्या नजरेतून वाचण्यासाठी चेतनने लढवली होती अनोखी शक्कल

Ben Stokes : भारत-इंग्लंडच्या सामन्यांआधी मोठी बातमी! दिग्गज क्रिकेटपटूची तडकाफडकी रिटायरमेंट, क्रिडाविश्वात खळबळ

Maharashtra News Live Update: बालबेडा जंगलात माओवाद्यांचा शस्त्रनिर्मिती कारखाना उद्ध्वस्त; पोलीस-सीआरपीएफची मोठी कारवाई

१,४०० किलोमीटर लांबी, ८ लेन; महाराष्ट्रासह पाच राज्यांना जोडणार द्रुतगती मार्ग, जाणून घ्या महामार्गाचे वैशिष्ट्ये

SCROLL FOR NEXT