Raj Thackeray  Saam Tv
मुंबई/पुणे

Pune MNS : पुणे मनसेत फूट? पदाधिकारी नाराज असल्याची चर्चा

पुण्यातील मनसेतील अंतर्गत कलह वाढल्याने काही पदाधिकारी हे बंडखोरीच्या पावित्र्यात

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सचिन जाधव

Pune News - पुण्यात (Pune) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे काही पदाधिकारी नाराज असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. आगामी महापालिका निवडणूक डोळ्यासमोर असून सुद्धा पुणे मनसेत काहीच हालचाली नाहीत. त्यामुळे पुण्यातील मनसे (MNS) फुटीच्या उंबरठ्यावर असल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.

ही फूट टाळण्यासाठी आणि पक्षाची पडझड रोखण्यासाठी मनसेची समन्वय समिती सक्रिय झाली आहे. ही समिती पदाधिकाऱ्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करणार आहे. पुण्यातील मनसेचे अनेक पदाधिकारी हे शिंदे गटाच्या संपर्कात असल्याचे बोलले जात आहे. तर दुसरीकडे वसंत मोरे अनेक वेगळ्या भूमिका घेत आहेत. यावर मनसे सरचिटणीस हेमंत संभुस यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. (Tajya News)

हेमंत संभुस म्हणाले की, ही बातमी चुकीची आहे. मुळात ही कुणीतरी पेरलेली न्युज आहे याचं कारण म्हणजे राज साहेबांनी आता सगळ्या निवडणुका स्वबळावर लढणार असल्याच सांगितल आहे. त्यामूळे अनेकांच्या पोटात पोटशूळ उठल आहे. आमचे शहराध्यक्ष सक्रिय आहेत, आंदोलन सुरु आहे. पुण्यात कुठलीही फूट नाही नसल्याचं देखील यावेळी हेमंत संभुस यांनी स्पष्ट केलं आहे. (Maharashtra News)

दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि त्यांचे सुपुत्र अमित ठाकरे हे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना ताकद देण्यासाठी राज्यभर दौरे करत असले तरी पक्षाच्या आक्रमक वृत्तीमुळे पुण्यातील मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्ते संभ्रमात पडले आहेत. सध्याच्या राजकीय परिस्थितीत राज ठाकरे काय ठोस भूमिका घेतात हे पाहणे आता महत्वाचे ठरणार आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

फालतू भानगडी करताय! भाजपला संपवायला निघाले का? सुधीर मुनगंटीवारांची ऑडिओ क्लिप व्हायरल

Weather Update: ११ राज्यांवर पावसाचं संकट! वादळी वारे अन् विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा

मुंबईत तरुण-तरुणीला बेदम मारहाण; अल्पवयीन गार्डन गँगचा धुडगूस

जमिनीच्या व्यवहारांवर ITची नजर; 2 लाखांवरील रोखीचे व्यवहार रडारवर

डिलिमिटेशन बिलासाठी खासदारांचा भाव 150 कोटी; राऊतांचा भाजपवर खळबळजनक आरोप

SCROLL FOR NEXT