Pune milk price today 
मुंबई/पुणे

Pune : पुण्यात दूध थेट १० रुपयांनी महागलं! भाव वाढण्यामागचं 'हे' आहे सर्वात मोठं कारण

Pune milk price today : पुणे जिल्ह्यात दुधाच्या दरात प्रतिलिटर सुमारे १० रुपयांची वाढ झाली आहे. FDA च्या भेसळविरोधी कारवाईनंतर दुधाचा पुरवठा घटल्याने मागणीच्या तुलनेत उपलब्धता कमी झाली आणि दर वाढले आहेत.

Namdeo Kumbhar

पुणे जिल्ह्यात शेतीला जोडव्यवसाय म्हणून दुग्ध व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांना सध्या दुधाच्या वाढलेल्या दरामुळे मोठा दिलासा मिळत आहे. दुधातील भेसळीविरोधात अन्न व औषध प्रशासनाची (FDA) धडक कारवाई सुरू झाल्यानंतर भेसळयुक्त दुधाचा पुरवठा कमी झाला आहे. त्यामुळे बाजारात उपलब्ध दुधाचे प्रमाण घटले असून, मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी झाल्याने दुधाच्या दरात वाढ झाली आहे.

शेतीसोबत दुग्ध व्यवसाय हा पुणे जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांचा महत्त्वाचा जोडव्यवसाय आहे. मात्र जनावरांच्या खाद्याचे वाढते दर आणि दुधाला मिळणारा कमी बाजारभाव यामुळे या व्यवसायातून नफा मिळवणे शेतकऱ्यांसाठी कठीण होत होते. आता मात्र परिस्थिती बदलताना दिसत आहे.

FDA ची धडक कारवाई

दुधातील भेसळीविरोधात अन्न व औषध प्रशासनाने राज्यभर कारवाईचा धडाका सुरू केला आहे. दूध संकलन केंद्रांपासून ते डेअरी, वाहतूक, वितरण आणि विक्रीपर्यंत विविध टप्प्यांवर तपासणी करण्यात आली. या कारवाईदरम्यान भेसळयुक्त आणि असुरक्षित दूध जप्त करण्यासोबतच संबंधित आस्थापनांवर कठोर कारवाई करण्यात आली.

पुरवठा घटल्याने दरात वाढ

भेसळयुक्त दूध बाजारातून कमी झाल्यानंतर त्याचा थेट परिणाम उपलब्ध दुधाच्या पुरवठ्यावर जाणवत आहे. दुसरीकडे ग्राहकांची मागणी कायम असल्याने बाजारात दुधाचा तुटवडा जाणवत आहे. पुरवठा कमी आणि मागणी जास्त अशी परिस्थिती निर्माण झाल्याने दुधाच्या दरात वाढ होत आहे. मुंबईच्या घाऊक बाजारातही दुधाच्या दरात वाढ झाली असून, भेसळविरोधी कारवाईमुळेच पुरवठ्यावर परिणाम झाल्याची चर्चा आहे.

दर ३५ वरून थेट ४५ रुपयांवर!

पुणे जिल्ह्यात दुधाचा दर ३५ रुपयांवरून सुमारे ४५ रुपयांपर्यंत पोहोचल्याने दुग्ध व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांना थेट फायदा होत आहे. पूर्वी मिळणाऱ्या दरातील मोठा हिस्सा जनावरांच्या खाद्य आणि पालनपोषणाच्या खर्चातच जात होता. आता प्रतिलिटर १० रुपयांची वाढ झाल्यामुळे खर्च वजा जाता शेतकऱ्यांच्या हातात समाधानकारक रक्कम शिल्लक राहत आहे.

विशेष म्हणजे, दुधातील भेसळ थांबवण्यासाठी झालेल्या कारवाईचा फायदा आता प्रामाणिकपणे दूध उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांना मिळत आहे, अशी भावना व्यक्त केली जात आहे. कष्टाने उत्पादित केलेल्या दुधाला योग्य बाजारभाव मिळत असल्याने या व्यवसायाकडे पाहण्याचा शेतकऱ्यांचा दृष्टिकोनही बदलत आहे.

दुधाची मागणी अशीच कायम राहिली आणि उत्पादनाच्या तुलनेत उपलब्धता कमी राहिली, तर आगामी काळात दर आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे सध्याचा वाढलेला दर टिकून राहावा आणि दुधाला आणखी चांगला भाव मिळावा, अशी अपेक्षा दुग्ध व्यावसायिक व्यक्त करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

जिंकलात तर यंत्रणा प्रामाणिक अन् हरलात तर फेरफार कशी? निवडणूक आयोगाच्या समर्थनार्थ १२४ IAS अधिकारी मैदानात

ब्लड शुगर कमी करण्यासाठी दररोज किती वेळ चालावे? जाणून घ्या नियमित चालण्याचे सोपे नियम

Bay Leaf Water For Kidney Stones: किडनी स्टोनवर तेजपत्याच्या पाण्याचा घरगुती उपाय, एकदा नक्की करून पाहा

Saree Designs: महिलांनी नऊरात्रीत नेसा 9 प्रकारच्या 9 साड्या, लेटेस्ट डिझाईन्स पाहा

Guava Leaves Benefits for Eye Stye : डोळ्याला रांजणवाडी आली असेल तर पेरूच्या पानांचा सोपा उपाय करा; मिळेल त्वरित आराम

SCROLL FOR NEXT