Pune Metro Line 3 inauguration date : पुण्यातील आयटी पार्कमधील लाखो कर्मचाऱ्यांच्या वाहतुकीचा कोंडीचा प्रश्न सोडवणाऱ्या हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो लाईन-३'बाबत अत्यंत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. मान ते बालवडी दरम्यानच्या पहिल्या टप्प्यातील १२ स्थानकांना रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडून (CMRS) आधीच मंजुरी मिळाली आहे. आता उर्वरित चार महत्त्वाच्या स्थानकांनाही (सकाळनगर, विद्यापीठ, आरबीआय आणि जिल्हा न्यायालय) लवकरच सुरक्षा मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. प्रकल्पाचे ९६.५ टक्के काम पूर्ण झाले आहे. १२ स्थानकांवर मेट्रो धावण्यासाठी पूर्णपणे सज्ज आहे. फक्त औपचारिक उद्घाटनाच्या अधिकृत तारखेची घोषणा बाकी असल्याने पुणेकरांची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे.
हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर हिंजवडी आयटी पार्कमध्ये दररोज ये-जा करणाऱ्या ५ लाखांहून अधिक आयटी कर्मचाऱ्यांना आणि स्थानिक पुणेकरांना ट्रॅफिक कोंडीतून मोठा दिलासा मिळणार आहे. सुरक्षा प्रमाणपत्रे मिळाली असली, तरीही प्रत्यक्ष प्रवाशांसाठी मेट्रो कधी सुरू होणार, याची अधिकृत तारीख आणि उद्घाटन अजून राज्य सरकार किंवा प्रशासनाकडून जाहीर करण्यात आलेले नाही. TOI ने याबाबतचे वृत्त दिले आहे.
उद्घाटनाच्या तारखेची प्रतीक्षा
सर्व तांत्रिक मंजुऱ्या आणि कामे पूर्ण होत असली, तरी मेट्रोचे औपचारिक उद्घाटन कधी होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पीएमआरडीएने उद्घाटनाच्या तारखेसाठी मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाकडे (CMO) पत्र पाठवले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १७ ऑगस्ट रोजी नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन या मेट्रो लाईनच्या उद्घाटनासाठी आमंत्रण दिले आहे. पण प्रशासनाकडून उद्घाटनाची अधिकृत तारीख अजून जाहीर करण्यात आलेली नाही. पंतप्रधान मोदींच्या कार्यालयाकडून लवकरच याबाबत अधिकृत तारीख दिली जाण्याची शक्यता आहे.
आयटी कर्मचाऱ्यांचा संताप आणि टीका
मेट्रोच्या कामाचा पहिला टप्पा तयार असूनही केवळ उद्घाटनाच्या तारखेसाठी विलंब होत आहे. त्यामुळे आयटी क्षेत्रातील नागरिक आणि विरोधी पक्षांनी प्रशासनावर टीका केली आहे. दररोजच्या ट्रॅफिक कोंडीमुळे नागरिक त्रस्त आहेत. जर पहिला टप्पा प्रवासासाठी तयार आहे, तर औपचारिक सोहळ्यासाठी उशीर का केला जात आहे? असा सवाल बाणेर आणि हिंजवडी भागात रोज प्रवास करणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून केला जात आहे.
२३.३ किलोमीटर लांबीचा हा हिंजवडी-शिवाजीनगर कॉरिडॉर 'पुणे आयटी सिटी मेट्रो रेल लिमिटेड'तर्फे सार्वजनिक-खाजगी भागीदारीत (PPP Model) साकारला जात आहे. टाटा ग्रुप आणि सिमेन्स यांचा संयुक्त उपक्रम या प्रकल्पाचे काम पाहत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डिसेंबर २०१८ मध्ये या प्रकल्पाची पायाभरणी केली होती. तांत्रिक अडचणी आणि मंजुऱ्यांमुळे प्रकल्पाला वेळोवेळी विलंब झाला. संपूर्ण २३ स्थानकांचा कॉरिडॉर पूर्ण करण्यासाठी मार्च २०२७ पर्यंतची मुदतवाढ मागण्यात आली आहे. तरीही सर्व स्थानके डिसेंबर २०२६ पर्यंत कार्यान्वित करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
पुणे मेट्रो लाईन-३ (हिंजवडी ते शिवाजीनगर) च्या पहिल्या टप्प्यात (मान ते बालेवाडी) खालील १२ स्थानके सुरू होणार आहेत:
मान (Maan)
आयटी पार्क (IT Park)
टेक्नॉलॉजी पार्क (Technology Park)
इन्फोसिस फेज २ (Infosys Phase 2)
विप्रो कंपनी (Wipro Company)
पाल आयटी पार्क (Pala IT Park)
शिवाजी चौक (Shivaji Chowk - Hinjawadi)
हिंजवडी (Hinjawadi)
वाकड चौधरी अट्टा (Wakad Wakad Chowk)
बालेवाडी स्टेडियम (Balewadi Stadium)
बालेवाडी High Street (Balewadi High Street)
आर. के. लक्ष्मण संग्रहालय / बालेवाडी (R. K. Laxman Museum / Balewadi)
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.