पुण्यातील हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो पुढच्या आठवड्यात धावणार
पुणे मेट्रो लाईन- 3 चे उद्धाटन पीएम मोदींच्या हस्ते ३ नोव्हेंबरला सुरू होणार
पुणेकरांचा प्रवास लवकरच सुसाट होईल
पुणेकरांसाठी आनंदाची बातमी आहे. हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो धावण्याला अखेर मुहूर्त मिळाला. पुढच्या आठवड्यात ही मेट्रो धावणार आहे. त्यामुळे पुणेकरांचा प्रवास लवकरच सुसाट आणि गारेगार होणार आहे. ३ नोव्हेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते या मेट्रोलाचा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे. पीएम मोदी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे मेट्रोला हिरवा झेंडा दाखवणार आहेत. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या कार्यक्रमाला प्रत्यक्ष उपस्थित राहतील.
हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो लाइन- ३ कधी सुरू होणार याची वाट पुणेकर पाहत होते. अखेर त्यांची ही प्रतीक्षा संपली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा बारामती दौरा लांबणीवर पडल्यामुळे मेट्रोचे उद्घाटन रखडणार अशी चर्चा सुरू होती. अशात मेट्रो उद्घाटनाची तारीख समोर आली. ३ नोव्हेंबरला या मेट्रोचे उद्घाटन होणार आहे. विधान परिषद निवडणुकीची आचारसंहिता उठल्यानंतर पुढच्या दोन दिवसांत याबाबत अधिकृत घोषणा होणार आहे. बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात होणाऱ्या मुख्य सोहळ्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री प्रत्यक्ष उपस्थित राहणार आहेत.
हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो लाइन- ३ ही २३ किलोमीटर इतकी आहे. एकूण पूर्ण मार्गावरील २३ पैकी १७ स्टेशन्स आता सुरु होणार आहेत. या १७ स्थानकांना मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्तांची सुरक्षा तपासणी पूर्ण होऊन रीतसर परवानगी मिळाली होती. या मेट्रो लाईनवर गेल्या १०० हून अधिक दिवसांपासून मेट्रोच्या ट्रायल सुरू आहेत. हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो लाइन- ३ हा मेट्रो मार्ग हिंजवडीतील राजीव गांधी इन्फोटेक पार्कला शिवाजीनगर या प्रमुख व्यावसायिक आणि प्रशासकीय केंद्रांना जोडणार आहे.
हिंजवडी-शिवाजीनगर c लाइन- ३ ही २३ किलोमीटर इतकी आहे. एकूण पूर्ण मार्गावरील २३ पैकी १७ स्टेशन्स आता सुरु होणार आहेत. या १७ स्थानकांना मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्तांची सुरक्षा तपासणी पूर्ण होऊन रीतसर परवानगी मिळाली होती. या मेट्रो लाईनवर गेल्या १०० हून अधिक दिवसांपासून मेट्रोच्या ट्रायल सुरू आहेत. हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो लाइन- ३ हा मेट्रो मार्ग हिंजवडीतील राजीव गांधी इन्फोटेक पार्कला शिवाजीनगर या प्रमुख व्यावसायिक आणि प्रशासकीय केंद्रांना जोडणार आहे.
१ - मेगापॉलिस सर्कल (माण)
२ - एम्बसी क्वॉड्रन बिझनेस पार्क
३ - डोहलेर
४ - इन्फोसिस फेज २
५ -विप्रो फेज २
६ -पाल इंडिया
७ - शिवाजी चौक, हिंजवडी
८ - हिंजवडी
९ - वाकड चौक
१० - बालेवाडी स्टेडियम
११ - एनआयसीएमएआर
१२ - रामनगर
१३ - बालेवाडी हाय स्ट्रीट
१४ - बालेवाडी फाटा
१५ - बाणेर गाव
१६ - बाणेर
१७ - कृषी अनुसंधान
१८ - सकाळनगर / यशदा परिसर
१९ - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ
२० - आरबीआय
२१ - ॲग्रिकल्चर कॉलेज
२२ - शिवाजीनगर
२३ - सिव्हिल कोर्ट (जिल्हा न्यायालय)
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.