pune metro line 3  Saam Tv
मुंबई/पुणे

Pune Metro News : पुणेकरांची वाहतूक कोंडीतून सुटका, मेट्रो ३ प्रकल्पाचा अडथळा दूर

Pune Metro Line-3: पुणेकरांचा प्रवास आता आणखी सोयीस्कर होणार असून मेट्रो ३ साठी जागा शंभर टक्के उपलब्ध झाली आहे. यामुळे पुणेकरांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे.

Omkar Sonawane

पुणे: माण-हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो लाईन-३ प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या सर्व जागा उपलब्ध झाल्या असून, आता या प्रकल्पाच्या कामाला आणखी गती मिळणार आहे. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) मेट्रो सवलतकार कंपनी पुणे आयटी सिटी मेट्रो रेल लि. यांना १०० टक्के जागा हस्तांतरित केल्या आहेत.

हा मेट्रो प्रकल्प २३.२०३ किलोमीटर लांबीचा असून, त्याची अंमलबजावणी सार्वजनिक-खाजगी भागीदारी (PPP) तत्वावर करण्यात येत आहे. या प्रकल्पास ९ फेब्रुवारी २०१८ रोजी शासनाने मान्यता दिली होती. आतापर्यंत या प्रकल्पाचे ८३ टक्के काम पूर्ण झाले आहे.

शेवटच्या टप्प्यातील जागा मिळाली

प्रकल्पासाठी पुणे विद्यापीठ परिसरातील राजभवन कार्यालयाजवळील २६३.७८ चौ.मी. जागा जीन्यासाठी आवश्यक होती. त्यासाठी नोव्हेंबर २०२२ मध्ये प्रस्ताव सादर करण्यात आला होता. राजभवन कार्यालयाने या जागेच्या हस्तांतरणास मंजुरी दिल्याने आता मेट्रो प्रकल्पासाठी आवश्यक असलेली संपूर्ण जागा उपलब्ध झाली आहे.

मेट्रो प्रकल्पाच्या पूर्णत्वाला गती

या महत्त्वपूर्ण टप्प्यामुळे पुणे मेट्रो लाईन-३ प्रकल्पाला वेग मिळणार आहे. लवकरच हा प्रकल्प कार्यान्वित होऊन पुणेकरांसाठी एक नवीन प्रवास सुविधा सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: एकनाथ शिंदे अमित शहांसमोर लाचार झाले, ठाकरे गटाच्या किशोरी पेडणेकरांचा हल्लाबोल|VIDEO

Maharashtra Live News Update: देवेंद्र फडणवीसांना दिलासा; निवडणुकीसदंर्भातील याचिका कोर्टाने फेटाळली

Who is Sushil Kedia: राज ठाकरेंना ट्विट करत धमकी देणारे सुशील केडिया कोण आहेत?

उपवासात मिळवा चव आणि पोषण यांचा मेळ; बनवा ही खास इडली

Dharashiv : आदिवासी समाजावर ग्रामपंचायतीचा सामाजिक बहिष्कार; सरपंच व ग्रामसेवकावर कारवाईची मागणी

SCROLL FOR NEXT