Maval Crime News Saam Tv
मुंबई/पुणे

Maval News: ऑनलाईन गेमचा जीवघेणा टास्क? 'आत्महत्या करतोय...' मित्राला मेसेज करत १०वीतील मुलाने संपवले आयुष्य

Maval Dehuroad Latest News: तरुणाला मोबाईल गेमिंगचा खूप छंद होता, त्यातून तो अनेक चॅलेंजेंस स्विकारत असल्याची माहिती त्याच्या भावाने पोलिसांनी दिली.

दिलीप कांबळे

Pune Maval News: मित्राला मेसेज करुन दहावीत शिकणाऱ्या मुलाने रेल्वेखाली उडी घेत आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. देव कुमार असे या आत्महत्या केलेल्या मुलाचे नाव आहे. मावळातील देहूरोड परिसरात घडलेल्या या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. (Crime News In Marathi)

याबाबत सविस्तर माहिती अशी की, देव कुमार हा लष्करातील एएसआय अधिकाऱ्यांचा मुलगा आहे. मुळचे मथुरेतील असलेले हे कुटूंब देहुरोड (Dehuroad) परिसरात राहते. 30 ऑगस्टच्या रात्री देवची आई कामानिमित्त मथुरेला गेली होती, तर वडील ड्युटीवर होते. त्यामुळे देव कुमार हा आपल्या दोन भावांसह घरात होता.

याचदरम्यान, देवने मित्राला आत्महत्या करत असल्याचा मेसेज टाकला आणि पुढच्या तासाभरात रेल्वेमार्गाकडे जात धावत्या रेल्वेसमोर उडी मारुन जीव दिला. काही वेळाने लोहमार्गावर त्याचा मृतदेह आढळल्याने हा संपूर्ण प्रकार समोर आला.

धक्कादायक बाब म्हणजे देवला मोबाईल गेमिंगचा खूप छंद होता, त्यातून तो अनेक चॅलेंजेंस स्विकारत असल्याची माहिती त्याच्या भावाने पोलिसांनी दिली. त्यामुळे हा संपूर्ण प्रकार याच ऑनलाईन गेमिंग टास्कमुळे तर झाला नाही ना? असा सवाल उपस्थित होत आहे. पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांची तब्येत खालवली; तातडीनं रुग्णालयात दाखल

विधानपरिषद निवडणुकीत शिंदेसेना-भाजप आमनेसामने; महायुतीतला वाद चव्हाट्यावर

रामलीला मैदानावर रावणासोबत झुरळही जाळणार; स्वच्छ भारत अभियानाचा दावा की राजकीय निशाणा?

CJPच्या आंदोलनाआधीच दिपके पोलिसांच्या ताब्यात; दिल्लीत पुन्हा एकदा हायव्होल्टेज ड्रामा

तिकीट तपासणीवरून महिला प्रवासीचा टीसीसोबत वाद; कांदिवली स्टेशनवर नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT