Pune Crime Saam Tv
मुंबई/पुणे

Pune Crime : आधी मारहाण, मग दगडाने ठेचून मारलं, पतीचा पत्नीसोबत रक्तरंजीत खेळ; धक्कादायक कारण समोर

Pune Crime News : पुण्यातील विवाहित महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पुण्याच्या वडगाव मावळमध्ये चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा पतीनेच केला दगडाने ठेचून खून झाल्याची माहिती समोर आली आहे.

Yash Shirke

दिलीप कांबळे, साम टीव्ही, प्रतिनिधी

पुणे जिल्ह्यातील पिंपरी-चिंचवडमध्ये वैष्णवी हगवणेच्या मृत्यूने राज्यामध्ये विवाहित महिलांना होणारा छळ हा मुद्दा ऐरणीवर आला आहे. मारहाण, चारित्र्याचा संशय यामुळे वैष्णवी त्रासली होती. हुंड्यापायी होणाऱ्या त्रासाला कंटाळून वैष्णवीने आत्महत्या केल्याचे म्हटले जात आहे. वैष्णवीने आत्महत्या केली नाही, तिची हत्या झाल्याचे वैष्णवीच्या आईवडिलांनी म्हटले आहे. हे प्रकरण ताजे असताना पुण्यात अशीच एक घटना घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील वडगाव मावळमध्ये चारित्र्याचा संशयावरून पतीने पत्नीची हत्या केली आहे. दगडाने ठेचून पतीने त्याच्या पत्नीचा खून केल्याचे उघडकीस आले आहे. सदर घटना कोंडिवडे अंदर मावळ हद्दीत घडली आहे. हा प्रकार समोर आल्यानंतर परिसरात रोष व्यक्त केला जात आहे.

सोनाबाई अशोक वाघमारे (वयवर्ष ३३) असे मृत महिलेचे नाव आहे, तिच्या पतीचे नाव अशोक बारकु वाघमारे (वयवर्ष ४०) असे आहे. मावळ तालुक्यातील कोंडिवडे येथे दोघे राहत होते. चारित्र्याच्या संशयावरुन अशोक यांनी दगडाने ठेचून सोनाबाई यांची हत्या केली. अशा घटना घडत असल्यामुळे महिलांची सुरक्षा आणि न्याय हे मुद्दे चर्चेत आहेत.

२३ वर्षांच्या वैष्णवी हगवणेचा जीव सासरी होणाऱ्या छळामुळे गेला. हुंड्यासाठी तिच्या सासरकडच्या मंडळींनी वैष्णवीचे हाल केले होते. १६ मे रोजी तिने छळाला कंटाळून स्वत:ला संपवले. या प्रकरणी पोलिसांनी वैष्णवीचा नवरा शशांक, सासू लता आणि नणंद करिष्मा यांना अटक केले होते. आज २३ मे रोजी तिचा सासरा राजेंद्र आणि दीर सुशील यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dhule : सातव्या बायकोने पोटच्या मुलांसह केली आत्महत्या, नवऱ्याच्या 'त्या' कृत्याने सर्वच हादरले

Actor Death: प्रसिद्ध अभिनेता काळाच्या पडद्याआड; मनोरंजन विश्वावर शोककळा

Solapur Highway: सोलापूरकरांसाठी आनंदाची बातमी! या राष्ट्रीय महामार्गाचा विस्तार होणार; ३५३ कोटींचा निधी मंजूर

Skin Care : चेहऱ्यावर तिळाचे तेल लावण्याचे आश्चर्यकारक फायदे, जाणून घ्या

Maharashtra Live News Update : दहिसरहुन गुंदवलीला येणाऱ्या मेट्रोमध्ये तांत्रिक बिघाड

SCROLL FOR NEXT