Pune Saam
मुंबई/पुणे

Pune: शर्ट काढून धिंगाणा अन् पोलिसांवर हात उगारण्याचा प्रयत्न; दारूड्यानं पुण्यात घातला राडा

Video of Drunk Man Harassing Police: पुण्यात दारूच्या नशेत असलेल्या एका तरुणाने पोलिसांवर हात उगारण्याचा आणि झटापट करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

Bhagyashree Kamble

अक्षय बडवे, साम टीव्ही

पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. एका तरूणाने दारूच्या नशेत पोलिसांवर हाथ उगारण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच शर्ट काढून गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला असल्याची माहिती समोर आली आहे. ही घटना १८ मे रोजी रात्री ११.१५ वाजताच्या सुमारास घडली असून, संबंधित तरूणाचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे. याप्रकरणी पोलिसांनी संबंधित तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

प्राथमिक माहितीनुसार, पुणे शहराच्या मध्यवर्ती रामेश्वर चौक, मंडई परिसरात एका तरुणाने अंगावरचा शर्ट काढून सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. पोलिसांनी तातडीने तरूणाला अडवून चौकशीसाठी पोलिस चौकीत नेत असताना, त्याने पोलिसांचा हात झटकून वाद घालण्याचा प्रयत्न केला.

इतक्यावरच न थांबता, त्या तरुणाने पोलिसांवर हात उगारण्याचा आणि झटापट करण्याचा प्रयत्न केला. घटनास्थळी उपस्थित अन्य पोलिसांनी वेळेवर हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली. या घटनेचा व्हिडिओ स्थानिक नागरिकांनी शूट करून सोशल मीडियावर शेअर केला. हा व्हिडिओ क्षणातच व्हायरल झाला.

पोलिसांनी संबंधित तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Traffic E-Challan : ट्रॅफिक ई-चलन थकीत आहे? रस्त्यावरच गाडी जप्त होणार! जाणून घ्या सुप्रीम कोर्टाचे 'हे' १० कडक नियम

Maharashtra News Live Update: अवघ्या 10 वर्षांतच हातोडा पुलाला तडे! 11 ठिकाणी भेगा, मोठे खड्डे; वाहनचालकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

Indian Railway Food: ट्रेनमध्ये दिल्या जाणाऱ्या जेवणात कोणते पीठ आणि तांदूळ वापरले जाते? जाणून घ्या

Bigg Boss 20: बिग बॉस २०मध्ये मोठा ट्विस्ट; ११ स्पर्धकांवर एलिमिनेशनची टांगती तलवार, फक्त ३ सदस्य सेफ

मनोज जरांगेंच्या अडचणी वाढणार? अंतरवाली सराटीतील महिला कार्यकर्त्याचा पोलिसांत सर्वात मोठा दावा, नेमकं प्रकरण काय?

SCROLL FOR NEXT