PMPML bus Saam TV Marathi
मुंबई/पुणे

थेट PMPML बस चोरी करण्याचा प्रयत्न; दिवसाढवळ्या पुण्यातील डेक्कन परिसरात थरार

Pune latest crime news : पुण्यात डेक्कन बस स्थानकातून PMPML बस चोरी करण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आरोपी बस घेऊन गुडलक चौकापर्यंत पोहोचला, मात्र पुणे पोलिसांनी तत्परतेने कारवाई करत त्याला अटक केली.

Namdeo Kumbhar

सचिन जाधव, पुणे प्रतिनिधी

PMPML bus stolen in Pune Deccan are : पुणे शहरात आज संध्याकाळी एक धक्कादायक घटना घडली. MH 12 YB 5086 क्रमांकाची PMPML बस सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास डेक्कन बस स्थानकातून एका अज्ञात व्यक्तीने चोरली. आरोपी ही बस चोरून थेट गुडलक चौकापर्यंत घेऊन आला. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून आरोपीला ताब्यात घेतले आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास केला जात आहे.

मात्र, चौकात बस वळवताना आरोपीचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्याच्या संशयास्पद हालचालींमुळे परिसरातील पोलिसांचे लक्ष त्याच्याकडे गेले. पोलिसांनी तत्काळ पाठलाग करून सिग्नलजवळ बस थांबवली आणि चालकाला ताब्यात घेतले. प्राथमिक चौकशीत संबंधित व्यक्तीने बस चोरल्याचे उघड झाले आहे.

या घटनेत पुणे पोलिसांची तत्परता दिसून आली. पोलिसांनी बस सुरक्षितपणे पुन्हा डेक्कन डेपोमध्ये आणली असून, आरोपीला डेक्कन पोलीस ठाण्यात नेण्यात आले आहे. आरोपीने हे कृत्य नेमके कोणत्या कारणासाठी केले, याचा तपास डेक्कन पोलीस करत आहेत. सुदैवाने, या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shravan Fashion : श्रावणात साडीवर 'ह्या' बांगड्या घाला, प्रत्येक जण करेल कौतुक; बघा ट्रेंडी कॉम्बिनेशन्स

मोठी बातमी! भाजपच्या केंद्रीय मंत्र्यांच्या भावावर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा, राजकीय वर्तुळात खळबळ

FDA Action : बीडमध्ये FDAची मोठी कारवाई! ५ उद्योगांवर धाड; १,९४,५०,९२२ किंमतीचे तेल जप्त; परवानेही केले निलंबित

Kidney Stone : सामान्य वाटणारी 'ही' लक्षणं देतात किडनी स्टोनचा संकेत, दुर्लक्ष करणे महागात पडेल

Maharashtra News Live Update: अहिल्यानगरमध्ये अज्ञात इसमान कडून 42 वर्षीय महिलेची हत्या

SCROLL FOR NEXT