Maval Gram Panchayat Saam TV
मुंबई/पुणे

मावळात राजकीय भूकंप! राष्ट्रवादीच्या सरपंचासह ५ सदस्यांचे पद रद्द; अतिरिक्त विभागीय आयुक्तांचे आदेश

Maval Gram Panchayat : मावळ तालुक्यातील भाजे ग्रामपंचायतीत मोठी राजकीय उलथापालथ झाली आहे. कर थकबाकीच्या प्रकरणात सरपंच, उपसरपंच आणि चार सदस्यांसह सहा जणांना अतिरिक्त विभागीय आयुक्तांनी अपात्र ठरवले आहे.

Namdeo Kumbhar

दिलीप कांबळे, मावळ प्रतिनिधी:

Maval Bhaje Gram Panchayat sarpanch disqualification latest news : मावळ तालुक्यातील भाजे ग्रामपंचायतीच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली आहे. कर थकबाकीच्या प्रकरणाने थेट ग्रामपंचायतीच्या कारभारालाच हादरा दिला असून, सरपंचासह उपसरपंच आणि चार सदस्यांना अपात्र ठरवण्यात आले आहे. भाजे ग्रामपंचायतीमध्ये सरपंचासह एकूण १० सदस्यांची संस्था (बॉडी) असून, त्यापैकी ६ सदस्य राष्ट्रवादी काँग्रेसचे तर ४ सदस्य भाजपचे आहेत.

अपात्र ठरलेल्यांमध्ये सरपंच प्रिया ओव्हाळ, उपसरपंच कोमल केदारी, सदस्य विकास वाल्हेकर, प्रमोद ढगे, सारिका पदमुले आणि कविता चौरे यांचा समावेश आहे. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमातील तरतुदीनुसार, ग्रामपंचायत कराची थकबाकी विहित मुदतीत न भरल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.

प्रताप गरवड आणि शेखर दळवी यांनी याप्रकरणी तक्रार अर्ज दाखल केला होता. प्रकरणाची चौकशी, सुनावणी आणि कागदपत्रांची पाहणी केल्यानंतर अतिरिक्त विभागीय आयुक्त कविता द्विवेदी यांनी या सर्व सदस्यांना अपात्र ठरवण्याचा आदेश दिला.

दुसरीकडे, "राजकीय आसापोटी ग्रामसेवकाला हाताशी धरून आमचे राजकीय अस्तित्व संपवण्याचे षड्यंत्र विरोधकांनी रचले आहे," असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे अपात्र सदस्य विकास वाल्हेकर यांनी केला आहे. तर, "सरपंचांसह पाचही सदस्यांनी टॅक्स न भरल्यामुळे त्यांच्यावर ही कारवाई झाली आहे," अशी माहिती ग्रामसेवक गजानन जाधव यांनी दिली आहे.

या निर्णयामुळे आता भाजे ग्रामपंचायतीतील सत्तेची समीकरणे बदलणार का? ग्रामपंचायतीचे पुढील कामकाज कसे चालणार? आणि आगामी राजकीय घडामोडींवर याचा काय परिणाम होणार? याकडे संपूर्ण मावळ तालुक्याचे लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर येथे 'इन्व्हेस्ट महाराष्ट्र' उपक्रमाचा शुभारंभ

Ramesh Mhatre : डॉक्टर मारहाण प्रकरणी नगरसेवक रमेश म्हात्रेला सुप्रीम कोर्टाचा दणका, ५ ऑक्टोबरआधी सरेंडरचा आदेश

कारमध्ये मोठ्या आवाजात गाणे वाजवले तर चालान लागते का? काय आहे नियम

Weight Loss : धावणे की सायकल चालवणे; वजन झटपट कमी करण्यासाठी काय फायदेशीर? १५ दिवसांत फरक दिसेल

Maharashtra Lake : आकाशाचं प्रतिबिंब अन् हिरवागार साज, महाराष्ट्रातील 'या' तलावाचं सौंदर्य आहे पाहण्यासारखं

SCROLL FOR NEXT