Pune lok Sabha  Saam tv
मुंबई/पुणे

Pune lok Sabha : मुरलीधर मोहोळ यांच्या विरोधात काँग्रेसची आचारसंहिता भंगाची तक्रार

pune lok sabha constituency : निवडणूक आयोग आणि स्थानिक जिल्हा प्रशासनाकडून बारकाईने लक्ष आहे. अशातच काँग्रेसने पुण्यातील भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या विरोधात आचारसंहिता भंगाची तक्रार दाखल केली आहे.

Vishal Gangurde

सागर आव्हाड, पुणे

पुणे : देशभरात लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरु आहे. या लोकसभा निवडणुकीमुळे आचारसंहिता सुरु आहे. यामुळे निवडणूक आयोग आणि स्थानिक जिल्हा प्रशासनाकडून बारकाईने लक्ष आहे. अशातच काँग्रेसने पुण्यातील भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या विरोधात आचारसंहिता भंगाची तक्रार दाखल केली आहे.

पुणे लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या विरोधात काँग्रेसतर्फे आचारसंहिता भंगाची तक्रार दाखल केली आहे. मुरलीधर मोहोळ यांनी वर्तमानपत्राच्या माध्यमातून 'राम मंदिर झाले आता राष्ट्रमंदिरासाठी संकल्प करूयात' या मथळ्याखाली जाहिरात केली. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अयोध्येतील राममूर्तीच्या पाया पडत आहेत असे छायाचित्र असलेली पत्रके वाटली. या प्रकरणी मुरलीधर मोहोळ यांच्या विरोधात काँग्रेसने आचारसंहिता भंगाची तक्रार दाखल केली.

याप्रकरणी माजी आमदार मोहन जोशी आणि काँग्रेसचे सोशल मीडिया राज्य समन्वयक चैतन्य पुरंदरे यांनी यांनी या तक्रारीबद्दल सांगितलं. 'राम मंदिराला निवडणूक प्रचाराचा मुद्दा बनवला, याद्वारे धार्मिक प्रलोभन दाखवून मोहोळ यांनी मतदारांवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केला आहे, असा काँग्रेसने केला आहे.

त्यानंतर काँग्रेसचे पुरंदरे यांनी आदर्श आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी मोहोळ यांच्या विरुद्ध तक्रार दाखल केली होती. त्यावर निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने पुरंदरे यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले असल्याचे काँग्रेसकडून सांगण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hotel Kitchen Food : धक्कादायक! तुमच्या जेवणात कचरा ? व्हिडिओ पाहून तळपायाची आग मस्तकात जाईल | VIDEO

Ramayana: जगातील सर्वात भव्य महाकाव्यांचा आरंभ 'रामायण'; अभिनेता रणबीर कपूरची मोठी भूमिका

Bhoj Dam : भोज धरणावर मस्ती भोवली; पर्यटक पाण्याच्या प्रवाहात अडकला, सुदैवाने वाचला जीव

Raj Thackeray: राज ठाकरेंबाबात वादग्रस्त पोस्ट, पुण्यात मनसैनिक आक्रमक; पाहा VIDEO

Maharashtra Live News Update: सिंधुदुर्ग जिल्ह्यात पुढील 3 ते 4 तासांसाठी रेड अलर्ट

SCROLL FOR NEXT