Vasant More On Pune Lok Sabha by Election  Saam Tv
मुंबई/पुणे

Pune Lok Sabha by Election News: '...तर मी पुणे लोकसभेची पोट निवडणूक लढवणार', वसंत मोरे यांचं मोठं वक्तव्य

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

>> अक्षय बडवे

Vasant More On Pune Lok Sabha by Election: 'पक्षानं जर संधी दिली तर मी निवडणुकीसाठी तयार आहे', असं वक्तव्य महाराष्ट्र नवनिर्मण सेनेचे (MNS) नेते वसंत मोरे (Vasant More) यांनी केलं आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि खासदार गिरीश बापट (Girish Bapat) यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक होण्याची शक्यता आहे. यातच माध्यमांशी बोलताना वसंत मोरे यांनी हे मोठं वक्तव्य केलं आहे.

राज्यात आतापर्यंत अनेक पोटनिवडणुका बिनविरोध झाल्या आहेत. मात्र या पोटनिवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी तयारी केली आहे. यातच वसंत मोरे यांचं हे वक्तव्य महत्वाचं म्हणालं जात आहे.

काय म्हणाले वसंत मोरे?

वसंत मोरे म्हणाले की, ''पक्षानं जर संधी दिली तर मी निवडणुकीसाठी तयार आहे.'' ते म्हणाले, ''2017 ची पुणे मनपाची निवडणूक पाहिली तर मध्यमवर्गीय उमेदवार होते, तरीही पुणे शहरातील मतदान पाहता 3 लाख 79 हजार मतं आहेत. पोटनिवडणुकीत कोणी मोठा तुल्यबळ नेता धाडस करणार आहे.''  (Latest Marathi News)

'तर मी राज ठाकरेंशी बोलेन'

मोरे म्हणाले, ''मनसे कार्यकर्ता जर झाडून कामाला लागला तर चमत्कार घडू शकेल.'' ही पोटनिवडणूक लढवण्याची तुमची इच्छा आहे का? असं त्यांना विचारलं असता ते म्हणाले, ''निवडणूक लढवण्यासाठी इच्छा का नसावी? माझं काम चांगलं आहे. राजकारणात असेल तर मोठी स्वप्न पाहिली पाहिजे. वाहतूक, आरोग्य क्षेत्रातील कामं पाहता निवडणूक लागली तर मी राज ठाकरेंशी बोलेन.''

दरम्यान, अलीकडेच वसंत मोरे यांनी फेसबुकवर मनसेच्या एका फेसबुक ग्रुपवरील पोस्टचा स्क्रिनशॉट शेअर केला होता. यात लिहिलं होतं की,'पुणे लोकसभा पोटनिवडणुकीत वसंत मोरे यांना उमेदवारी मिळाली तर लिहून ठेवा, राज्यभरातून मनसे कार्यकर्ते प्रचारासाठी पुण्यात येतील'. त्यांच्या या पोस्टवर समर्थकांनी कमेंट्सचा वर्षाव केला होता.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bigg Boss Grand Finale : 'आज की रात...' जान्हवी-निक्कीच्या दिलखेचक अदा, ग्रँड फिनालेला धुरळा उडणार

Buldhana News : उपवासाची भगर खाल्ल्याने विषबाधा; महिलांना उलटी. पोटदुखीचा त्रास, उपचारासाठी दाखल

Marathi News Live Updates : बीआरएसएसचे अनेक नेते शरद पवारांच्या राष्ट्रवादीत; आज 'तुतारी' हाती घेणार

Bachchu Kadu : बच्चूभाऊंना विधानसभेच्या तोंडावर महायुतीकडून 'कडू' घास; एकमेव आमदार पळवला!

Viral News : रामाची भूमिका साकारणाऱ्या व्यक्तीला हार्ट अटॅक; मंचावरच सोडला जीव, धक्कादायक VIDEO

SCROLL FOR NEXT