Pune Crime SaamTv
मुंबई/पुणे

Pune Crime: पुणे पुन्हा हादरले! धर्मांतरासाठी बंदुकीचा धाक दाखवून महिलेवर सामूहिक बलात्कार

Lohgaon Pune Crime: पुण्याच्या लोहगाव परिसरात एका महिलेवर सामूहिक बलात्कार करण्यात आला आहे. र्मांतरासाठी बंदुकीचा धाक दाखवून दोघांनी हे कृत्य केले आहे. याप्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Priya More

सागर आव्हाड, पुणे

पुण्यामध्ये पतीने कात्रीच्या सहाय्याने पत्नीची हत्या केल्याची घटना ताजी असतानाच आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. धर्मांतरासाठी एका महिलेवर बंदुकीचा धाक दाखवून सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची घटना घडली आहे. पुण्याच्या लोहगाव परिसरात हा प्रकार घडला आहे. यामुळे पुण्यात खळबळ उडाली आहे. लोहगाव पोलिसांकडून याप्रकरणाचा तपास सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यामध्ये धर्मांतर करण्यासाठी दोघांनी ३२ वर्षीय महिलेला बंदुकीचा धाक दाखवून तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. पीडित महिला पुण्यातील लोहगाव परिसरात राहायला असून एका जिम ट्रेनरकडे जिम लावण्यासाठी गेल्यानंतर त्या दोघांची ओळख झाली. यानंतर तिला धर्मांतर करण्यासाठी प्रवृत्त करून एका ५५ वर्षे आरोपी आणि ३० वर्षीय आरोपीने बंदुकीचा धाक दाखवत तिच्यावर आळीपाळीने बलात्कार केला.

आरोपींनी सामूहिक बलात्कार केल्याचा व्हिडीओ आपल्या मोबाइलमध्ये कैद केला. हा व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी ते महिलेला देत होते. याप्रकरणी महिलेच्या तक्रारीवरून याप्रकरणात २ पुरुषांसह एका महिलेवर विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस या प्रकरणाचा तपास करत असून आरोपींचा शोध घेत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: काही मागण्या राजकीय फायद्यासाठी असतात, मनोज जरांगे पाटलांनी गणेशोत्सवाचा विचार करावा- सामंत

विद्यार्थ्यांच्या डब्यात कांदा-लसूण बंदी, भाजप आमदाराच्या शाळेत अजब फतवा

Team India Squad : टी २० मालिकेआधी टीम इंडियात मोठा बदल; गंभीरचा सर्वात विश्वासू खेळाडू बाहेर, 'विदर्भ एक्स्प्रेस'ची संघात एन्ट्री

एक-दोन दिवसात कुणबी प्रमाणपत्र देणं शक्य नाही; जरांगेंच्या मागण्यांवर जालनाच्या जिल्हाधिकाऱ्यांनी थेट नियमच सांगितला

Nanded Accident: नांदेडमध्ये ट्रक - व्हॅनचा भीषण अपघात; 6 जण जागीच ठार, ट्रकचालक केबिनमध्ये अडकला

SCROLL FOR NEXT