Pune Crime News  Saam TV
मुंबई/पुणे

पुणे हादरलं! प्रियकरासोबत लॉजवर गेली तरुणी; त्यानंतर घडलं भयंकर

दिप्ती काटमोडे (वय २४) असे खून झालेल्या तरुणीचे नाव आहे.

साम टिव्ही ब्युरो

पुणे : प्रियकरासोबत लॉजवर गेलेल्या प्रेयसीचा तीक्ष्ण शस्त्राने गळा चिरून खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पुण्यातील (Pune) स्वारगेट-सातारा रस्त्यावरील एका लॉजवर काल रात्री ही घटना (Crime) घडली आहे. सकाळी रूमची साफसफाई करण्यास आलेल्या कामगाराने रूमची पाहणी केली असता त्याला बाथरूममध्ये तरूणीचा रक्ताचा थारोळ्यात पडलेला मृतदेह दिसून आला. (Pune Crime News)

दिप्ती काटमोडे (वय २४) असे खून झालेल्या तरुणीचे नाव आहे. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, मृत दिप्ती ही आपल्या प्रियकरसोबत रविवारी रात्री लॉजवर आली होती.

दरम्यान, सोमवारी सकाळी नेहमीप्रमाणे रुमची साफसफाई करण्यासाठी लॉजवरील कर्मचारी रूममध्ये गेला असता, त्याला बाथरूममध्ये तरुणीचा रक्ताचा थारोळ्यात पडलेला मृतदेह दिसून आला. त्यानंतर त्याने तातडीने या घटनेची माहिती पोलिसांना दिली. (Pune Latest News)

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत तरुणीचा मृतदेह ताब्यात घेतला. दिप्तीची हत्या तिच्याच प्रियकराने केली असावी असा पोलिसांना संशय आहे. दिप्ती रविवारी रात्री आपल्या प्रियकरासोबत लॉजवर आली होती. त्यामुळे फरार झालेल्या प्रियकराचा पोलीस शोध घेत आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: वाशिम शहरातील पुसद नाका चौक परिसरातील रस्त्यांवर मोठमोठे खड्डे

Dhairyasheel Mohite Patil : आरोप करणाऱ्यांवर कायदेशीर भाषेत उत्तर; खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांची प्रतिक्रिया

Actor Death: प्रसिद्ध अभिनेत्याचा बिल्डिंगवरून पडून मृत्यू, ३७ व्या वर्षी घेतला जगाचा निरोप

ओबीसी आरक्षणासाठी तरूणाने आयुष्य संपवलं, मनोज जरांगेंची पहिली प्रतिक्रिया

वाईट कोलेस्ट्रॉल वाढल्यावर शरीरात होतात 'हे' बदल

SCROLL FOR NEXT