Pune Land Scam Saam Tv
मुंबई/पुणे

मोठी बातमी! पुण्यातील १५२ महसूल अधिकाऱ्यांवर थेट कारवाई, वाचा नेमकं काय आहे प्रकरण

Pune Revenue Officers Action : पुण्यात जमीन नोंदींमध्ये फेरफार केल्याप्रकरणी १५२ महसूल अधिकाऱ्यांवर मोठी कारवाई होणार आहे. कलम १५५ चा गैरवापर केल्याचे चौकशीत स्पष्ट झाले असून लवकरच निलंबन आणि विभागीय चौकशी होणार आहे.

Akshay Badve

Maharashtra Land Scam News : महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ मधील कलम १५५ चा गैरवापर करून जमिनीच्या नोंदींमध्ये फेरफार करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांविरुद्ध सरकारकडून कडक पावले उचलण्यात (Maharashtra land record scam investigation report) आली आहे. या प्रकरणी दोषी आढळलेल्या १५२ महसूल अधिकाऱ्यांची यादी अंतिम करण्याचे काम मंत्रालय स्तरावर सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दोषी आढलेल्याया १५२ अधिकाऱ्यांवर लवकरच निलंबन आणि विभागीय चौकशीची कुऱ्हाड कोसळणार आहे. (152 revenue officers Pune action details)

मंत्रालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, अनियमितता अतिगंभीर केलेल्या अधिकाऱ्यांमध्ये काही तत्कालीन तहसीलदार, नायब तहसीलदार आणि मंडळ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. त्या सर्वांच्या नावांसह प्रकरणनिहाय तपशील सरकारकडे पाठवण्यात आला आहे. गंभीर आणि मध्यम स्वरूपातील अनियमितता असलेल्या अधिकाऱ्यांचीही नावे समोर आलेली आहेत. यामध्ये पुणे जिल्ह्यातील १५२ अधिकाऱ्यांचा समावेस आहे. त्या अधिकाऱ्यांची वर्गवारीनुसार यादी तयार केली आहे. लवकरच संबंधितांवर विभागीय चौकशी, बदली आणि निलंबनाची कारवाई होणार आहे.

१५२ अधिकाऱ्यांमध्ये अतिगंभीर स्वरूप असणारे १५, गंभीर स्वरूप ८२ आणि मध्यम स्वरूप 55 अधिकाऱ्यांचा समावेश आहे. लोकप्रतिनिधींनी केलेल्या तक्रारींची दखल घेत राज्य सरकारने नाशिकचे विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमली होती. या समितीने गेल्या पाच वर्षांतील प्रकरणांची सखोल तपासणी करून आपला अहवाल सरकारला सादर केला आहे. यात काही प्रकरणांत संबंधित अधिकाऱ्यांनी अधिकाराच्या मर्यादबाहेर जाऊन जमीन नोंदीत फेरफार केल्याचे स्पष्ट झाले आहे. मालकी हक्क, वारस नोंदी आणि क्षेत्रफळ बदलाशी संबंधित प्रकरणांत मोठ्या प्रमाणावर अनियमितता झाल्याचे उघड झालेय. यामध्ये सेवानिवृत्त अधिकाऱ्यांचाही समावेश असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT