Broiler Chickens Death Saam TV
मुंबई/पुणे

Broiler Chickens Death : ३६०० कोंबड्यांचा गूढ मृत्यू; पोल्ट्री व्यवसायिकांचे लाखोंचे नुकसान, एका रात्रीत नेमकं काय घडलं?

Broiler Chickens Death : आंबेगाव तालुक्यातील लाखणगाव येथे ३६०० बॉयलर कोंबड्यांचा अचानक मृत्यू झाला. मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट नसून पोल्ट्री व्यवसायिकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

Shruti Vilas Kadam

Broiler Chickens Death : पुणे आंबेगाव तालुक्यातील लाखणगाव येथे एका पोल्ट्री शेडमधील तब्बल ३६०० बॉयलर कोंबड्यांचा अचानक मृत्यू झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर कोंबड्यांचा मृत्यू झाल्यामुळे पोल्ट्री व्यवसायिकांसह नागरिकांमध्ये भीती आणि चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे, मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसल्याने विविध तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, लाखणगाव येथील पोल्ट्री व्यावसायिक संतोष पोंदे यांच्या पोल्ट्री शेडमध्ये सुमारे ३७०० बॉयलर कोंबड्या होत्या. नेहमीप्रमाणे सायंकाळी खाद्य टाकण्यासाठी ते शेडमध्ये गेले असता, कोंबड्या मृतावस्थेत आढळून आल्या. या धक्कादायक घटनेत तब्बल ३६०० कोंबड्यांचा मृत्यू झाला असून केवळ सुमारे १०० कोंबड्या जिवंत राहिल्या आहेत.

अचानक घडलेल्या या घटनेमुळे पोल्ट्री व्यवसायिकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. इतक्या मोठ्या प्रमाणावर कोंबड्यांचा मृत्यू होणे ही अत्यंत दुर्मिळ घटना असल्याने प्रशासन आणि पशुसंवर्धन विभागालाही या प्रकरणाची गंभीर दखल घ्यावी लागणार आहे.

कोंबड्यांच्या मृत्यूमागे नेमके कारण काय, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे रोगाचा प्रादुर्भाव, खाद्यामध्ये झालेली विषबाधा, हवामानातील बदल किंवा इतर काही कारणे याबाबत चर्चा सुरू झाली आहे. मात्र, तपासणी अहवाल आल्यानंतरच याबाबत स्पष्टता येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CO, BDO सह १५ सरकारी अधिकारी तडकाफडकी सस्पेंड; मुख्यमंत्र्यांच्या निर्णयानं प्रशासकीय वर्तुळात खळबळ

महाकाय अजगरावर मुलांची घसरगुंडी! थरारक VIDEO पाहाच

Maharashtra News Live Update: शिवसेना नेते मुकेश जिवतोडे पोलिसांच्या ताब्यात

न्यूझीलंडविरुद्धच्या शेवटच्या २ सामन्यांत पूर्णपणे बदलणार टीम इंडिया; नव्या कर्णधार-उपकर्णधारासह मैदानात उतरणार

Latest Designs Saree: महिलांसाठी कमळाच्या डिझाईन्सच्या साड्या, लेटेस्ट ट्रेडिंग 5 पॅटर्न्स

SCROLL FOR NEXT