pune Bibwewadi attack Saam TV News
मुंबई/पुणे

Pune Koyta Gang : गाडी जोरात का चालवली विचारत पुण्यात तुफान राडा, कोयत्याने सपासप वार|VIDEO

pune Bibwewadi attack : पुण्यातील बिबवेवाडीत गाडीच्या वेगावरून वाद झाला आणि त्यातून कोयता गँगने तरुणावर जीवघेणा हल्ला केला. घटनेचा सीसीटीव्ही व्हायरल झाला असून, तिघांना अटक झाली आहे. पोलिसांनी आर्म्स ॲक्टखाली गुन्हा दाखल केला आहे.

सागर आव्हाड, साम टीव्ही, पुणे

Pune koyta Gang CCTV Video : पुणे शहरात पुन्हा एकदा कोयता गँगची दहशत कॅमेऱ्यात कैद झाली आहे. बिबवेवाडी परिसर कोयता गँगने धुमाकूळ घातलाय. गाडी जोरात चालवल्याच्या किरकोळ वादातून तीन जणांनी कोयत्याने एका व्यक्तीवर सपासप वार केले. बिबवेवाडीमध्ये तीन जणांनी प्रवीण जाधव या तरुणाला कोयत्याने मारहाण केल्याची धक्कादायक घटना कॅमेऱ्यात कैद झाली.

बिबवेवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडलेल्या या प्रकरणात पोलिसांनी तातडीने कारवाई केली. पोलिसांनी तिन्ही आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल केला. पोलिसांनी याप्रकरणी ऋतिक बाबू पवार, ओमकार गव्हाणे आणि सूरज शिंदे या तिघा आरोपींना अटक केली आहे. मारहाणीत वापरलेला कोयता पोलिसांनी जप्त केला आहे. पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत.

दहा दिवसांपूर्वी प्रवीण जाधव रस्त्याने जात असताना गाडीच्या वेगावरून आरोपींसोबत वाद झाला. हा वाद इतका टोकाला गेला की, आरोपींनी कोयता हातात घेऊन जाधव यांना धमकावले आणि मारहाण केली. या घटनेचा सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. जाधव यांनी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी तिन्ही आरोपींविरुद्ध आर्म्स ॲक्टअंतर्गत गुन्हा दाखल केला.

पुणे शहरात कोयता गँगच्या वाढत्या दहशतीमुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा कसून तपास सुरू केला आहे. अशा गुन्हेगारी प्रवृत्तींवर नियंत्रण ठेवण्यासाठी कठोर पावले उचलण्याचे आश्वासन दिले आहे. बिबवेवाडी पोलिसांचा पुढील तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: मोठी बातमी! संजय राऊत राज ठाकरेंच्या भेटीला, 'शिवतीर्थ'वर महत्वाची बैठक सुरू

Maharashtra News Live Update: उजनी धरणातील पाण्याचे ऑगस्टपर्यंत नियोजन

Gold Rate Today: अक्षय्य तृतीयेच्या दुसऱ्या दिवशी सोनं झालं स्वस्त; सुवर्णनगरीतील २२ अन् २४ कॅरेटचे दर किती?

CBSE Class 12 Result 2026: बारावीचा निकाल कधी लागणार? मोठी अपडेट समोर; मोबाइलवर रिझल्ट कसा पाहाल?

Bigg Boss Marathi 6: 'मला राकेश बापटच्या मुलांची आई व्हायचंय...'; राखी सावंतचं व्यक्त केली धक्कादायक इच्छा

SCROLL FOR NEXT