Pune Kothrud midnight firing latest news Saam tv
मुंबई/पुणे

Pune Crime : पुणे पुन्हा हादरलं! मध्यरात्री ५ जणांचा गोळीबार, निलेश घायवाळ टोळीकडून फायरिंग

Pune Kothrud midnight firing latest news : पुणे पुन्हा हादरलं आहे. कोथरूडमध्ये मध्यरात्री निलेश घायवळ टोळीने गोळीबार केला. या फायरिंगमध्ये प्रकाश धुमाळ गंभीर जखमी झाला असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

Namdeo Kumbhar

  • कोथरूडमध्ये मध्यरात्री निलेश घायवळ टोळीने गोळीबार केला.

  • प्रकाश धुमाळ यांना गोळी लागून ते गंभीर जखमी झाले.

  • या फायरिंगमध्ये तीन राउंड गोळ्या झाडण्यात आल्या.

  • पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध सुरू केला आहे.

सागर आव्हाड, पुणे प्रतिनिधी

Latest crime news from Pune city Kothrud area : गोळीबारीच्या घटनेनं पुणे पुन्हा एकदा हादरलं आहे. कोथरूडमध्ये मध्यरात्री निलेश घायवाळ याच्या टोळीतील ५ जणांनी फायरिंग केल्याचे समोर आलेय. यामध्ये एक व्यक्ती गंभीर जखमी झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. गोळीबारात जखमी झालेल्या व्यक्तीला तात्काळ रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. कोथरूडमधील घटनेची पोलिसांकडून दखल घेतली असून तपास वेगात सुरू करण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांत पुण्यामध्ये सातत्याने गोळीबाराच्या घटना घडत आहेत. आयुष कोमकर प्रकरण ताजे असतानाच आणखी एक गोळीबाराची घटना घडल्यामुळे पुण्यात खळबळ उडाली आहे. (Nilesh Ghaywal gang firing in Pune details)

पुण्यातील कोथरूडमध्ये गोळीबारात जखमी झालेल्याचे नाव प्रकाश धुमाळ असे आहे. निलेश घायवळ गँगमधील पाच जणांकडून गोळीबार करण्यात आला. मुसा शेख, रोहीत आखाड, गणेश राऊत आणि मयुर कुंभारे अशी अरोपींची नावे आहेत. गोळीबाराची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनेची नोंद केली असून तपास वेगात सुरू केला आहे. गोळीबार का झाला? यामागील कारण काय होतं? याचा तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.

कोथरूडमध्ये मध्यरात्री गोळीबार झाल्याची घटना समोर येताच पुण्यात एकच खळबळ उडाली आहे. यामध्ये एकजण गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. प्रकाश धुमाळ असे गोळीबार झालेल्या व्यक्तीचे नाव असून त्याला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या व्यक्तीच्या मानेला आणि मांडीला गोळी लागल्याची माहिती मिळत असून यावेळी तीन राउंड फायर करण्यात आल्या आहेत. कोथरूडच्या शिंदे चाळ जवळ ही फायरिंगची घटना घडली आहे. पोलिसांकडून घटनास्थळाची पाहणी करण्यात आली आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. निलेश घायवाळ गँगच्या पाचही आरोपींचा पोलिसांनी शोध सुरू केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : मनसेसोबत आघाडीवरुन काँग्रेसमध्ये मतभेद; वडेट्टीवारांचं समर्थन, गायकवाडांचा विरोध, VIDEO

Maharashtra Politics : दादांची मतदारांवर दादागिरी? अजितदादांची 'अर्थ'पूर्ण दहशत? VIDEO

Maharashtra Politics: ऑपरेशन लोटसमध्ये शिंदेंचे 35 आमदार फुटणार? भाजपकडून शिंदेंची कोंडी?

शिवसेनेचे एबी फॉर्म राष्ट्रवादीच्या आमदाराकडे; नगराध्यक्ष आणि वीस ते पंचवीस उमेदवारांना अपक्ष लढावं लागलं

Delhi Blast: बॉम्ब स्फोटप्रकरणी तपास यंत्रणेला मोठं यश; पुलवामा येथून इलेक्ट्रिशियन तुफैलला अटक

SCROLL FOR NEXT