Kondhwa Young Girl Raped by Delivery Boy Saam Tv News
मुंबई/पुणे

Kondhwa Girl Abused : डिलिव्हरी बॉयकडून तरुणीवर अत्याचार; ५०० CCTV तपासले, पुण्यातील 'त्या' घटनेत मोठा ट्विस्ट, सेल्फी घेतलेला तरुणच...

Kondhwa Young Girl Raped by Delivery Boy : कोंढव्यातील तरुणीवरील अत्याचार प्रकरणात पोलिसांकडून एकाला अटक करण्यात आली आहे. पुण्यातूनच या आरोपीला अटक करण्यात आली आहे. आरोपी हा तक्रारदार मुलीच्या ओळखीचा असल्याची माहिती आता समोर आली आहे.

Prashant Patil

पुणे : पुणे जिल्ह्यातील कोंढव्यामधील उच्चभ्रू सोसायटीतील तरुणीवरील बलात्काराच्या घटनेनं पुणे शहर हादरलं होतं. या प्रकरणातील आरोपीला शोधण्यासाठी पोलिसांची १० पथकं शोध घेत होती. अखेर या प्रकरणातील आरोपी पोलिसांना सापडल्याची माहिती समोर आली असून या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. कोंढव्यातील तरुणीवरील अत्याचार प्रकरणात पोलिसांकडून एकाला अटक करण्यात आली आहे. पुण्यातूनच या आरोपीला अटक करण्यात आली आहे. आरोपी हा तक्रारदार मुलीच्या ओळखीचा असल्याची माहिती आता समोर आली आहे. प्रकरणातील आरोपी हा तरूणीचा जुना मित्र असल्याचं सांगण्यात येत आहे.

तरुणीकडून खोटी माहिती देत डिलिव्हरी बॉय अनोळखी असल्याची माहिती तक्रारीत देण्यात आली होती. पोलिसांनी या संदर्भात एका तरुणाला ताब्यात घेतल्यानंतर हे दोघे एकमेकांना ओळखत असल्याचं समोर आलं आहे. गेल्या एका वर्षापासून या दोघांची ओळख आहे. दोघांमध्ये झालेले शारीरिक संबंध सहमतीने झाले असल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे. एक तरुण त्या फ्लॅटमध्ये आला जो ओळखीचा होता. त्याने काही सेल्फी काढल्या आणि तो तिथून निघून गेला, अशीही माहिती देण्यात आली आहे.

सेल्फी फोटोंसोबत सुद्धा काहीतरी छेडछाड करण्यात आली असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे. तर तरुणीनं माझी मानसिक स्थिती बरोबर नसल्याचं म्हटलं आहे. पोलिसांनी या तरुणाला ताब्यात घेतलं असून सुमारे पाचशे सीसीटीव्ही तपासले आहेत. क्राईम ब्रँच आणि स्थानिक पोलिसांनी तपास केल्यानंतर हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अतिप्रसंग झाला का नाही? याचा तपास पोलीस करत आहेत. त्यानंतरच अधिकची माहिती देण्यात येणार असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे.

मात्र, ज्या पद्धतीने तक्रार दिली ती चुकीची आहे. हे दोघे एकमेकांना ओळखत असून अनेकवेळा हा तरुण तरुणीला बाणेरवरून पिझ्झा आणि बर्गर तिच्या घरी पाठवत होता. घटनेच्या सकाळी साडेपाच वाजता या दोघांमध्ये व्हॉट्सअपवर संवाद झाला आहे, आणि ही घटना सात वाजता घडली आहे. त्यानंतर साडेआठ वाजता हा मुलगा तिथून निघून गेल्याची माहिती समोर आली आहे.

पिडितेची ससून रुग्णालयात काल मानसिक तपासणी करण्यात आली असून कन्सल्टिंग करण्यात आलं आहे. अधिकचा तपास तिचे नातेवाईक आल्यानंतर करण्यात येणार आहे. त्यानंतरच बलात्कार झाला का नाही? याचा तपास होईल, अशी प्रतिक्रिया पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली आहे. या सगळ्यांमध्ये पोलिसांना सुद्धा काय कारवाई करावी याची कायदेशीर बाजू पोलीस जाणून घेत असून अधिक तपास करून पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचं पोलीस आयुक्तांनी म्हटलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Navratri Remedies: नवरात्रीत सुपारीच्या पानांचा करा खास उपाय, मिळेल नोकरी व व्यवसायात यश

Today Gold Rate: नवरात्रीत सोन्याला पुन्हा झळाली; १० तोळ्यामागे ३००० रुपयांची वाढ; वाचा आजचे दर

Bigg Boss 19: नेहलची री-एन्ट्री, तान्याची पोलखोल, फरहाना - गौरवची कॅप्टनशिपसाठी भांडण; काय घडलं बिग बॉसच्या घरात

GK: एक ट्रेन चालवण्यासाठी किती खर्च येतो? जाणून घ्या सर्व माहिती

Maharashtra News : दिवाळीसाठी एसटीच्या ९०० विशेष फेऱ्या, कुठून किती बस धावणार?

SCROLL FOR NEXT