Pune Breaking
Pune Breaking Saam Tv
मुंबई/पुणे

Pune Breaking: पुण्यात भाजपच्या माजी पदाधिकाऱ्याने उचललं टोकाचं पाऊल; नेमकं करणं काय?

Shivani Tichkule

Pune Warje News: पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. वारजे येथील भाजपचे माजी पदाधिकारी संजय ज्ञानोबा बराटे (वय ५६) यांनी त्यांच्या कार्यालयात पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली. बराटे यांनी आत्महत्या का केली याचे कारण अद्याप समजू शकले नाही. बराटे भाजपचे माजी पदाधिकारी आणि वारजे मारुती देवस्थान ट्रस्टचे माजी अध्यक्ष होते. (Latest Marathi News)

त्यांच्यामागे पत्नी एक मुलगी, विवाहित बहिणी असा परिवार आहे. वारजे येथील मारुती देवस्थान ट्रस्टचे ते माजी अध्यक्ष होते. त्यांनी ट्रस्ट सुरू करून गावातील मंदिराचा जीर्णोद्धार केला. तसेच या ट्रस्टचे राघवदास विद्यालय असून त्याचे ते सध्या अध्यक्ष होते. हवेली तालुक्याचे भाजपचे (BJP) १९९५ दरम्यान सरचिटणीस होते.

त्यावेळी त्यांच्या पत्नी ज्योती यांनी भाजपकडून हवेली पंचायत समितीची निवडणूक लढविली होती. त्यांनी २००७ मध्ये महापालिकेची अपक्ष निवडणूक लढवली होती. त्यानंतर ते राजकारण सक्रिय राहिले नाही. भय्यू महाराज देशमुख यांचे ते शिष्य होते. (Pune News)

वारजे भागीरथीनगर येथील त्यांच्या इमारतीत सूर्योदय परिवाराचा सत्संग असायचा. अनेकवेळा भय्यू महाराज यांचे अनेक कार्यक्रम झाले. काही काळ त्यांनी बांधकाम व्यावसायिक म्हणून काम केले होते. (Maharashtra News)

वारजे एनडीए रस्त्यावर ते राहत असलेल्या इमारतीत त्यांचे कार्यालय होते. त्या कार्यालायत शुक्रवार संध्याकाळी त्यांच्या पत्नीस ते पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळले. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Hoarding Collapse: पुणे-सोलापूर रोडवरील भलं मोठं होर्डिंग कोसळलं; अनेक वाहनांसह घोडा अडकला

Maharashtra Rain News : राज्यात आजही अवकाळी पाऊस, वादळी वाऱ्याचा तडाखा; केळीच्या बागा भूईसपाट, विदर्भाला अतिवृष्टीचा इशारा

Today's Marathi News Live: पुणे सोलापूर रोडवर होर्डिंग कोसळलं; वाहनांचं मोठं नुकसान

Team India Head Coach : गौतम गंभीर होणार भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक?; २ संकेत अन् जोरदार चर्चा

Arvind Kejriwal: 'उद्या मी सर्व नेत्यांसोबत भाजप मुख्यालयात येतोय, ज्यांना अटक करायची आहे, करा', केजरीवाल यांचं थेट PM मोदींना आव्हान

SCROLL FOR NEXT