Pune Crime News  
मुंबई/पुणे

Pune News : तिघांनी काठी-दगडाने मारले, भररस्त्यात तरूणाची क्रूर हत्या, पुण्यातलं आंबेगाव हादरले

Pune Crime News : पुण्याच्या कात्रजमध्ये जागेच्या वादातून २३ वर्षीय शुभम चव्हाण याचा तिघांनी काठी-दगडाने खून केला. आरोपी अमर साकोरे आणि त्याचे साथीदार फरार आहेत. आंबेगाव पोलिसांकडून त्यांचा शोध घेतला जात आहे.

Namdeo Kumbhar

Pune Latest crime News Update : पुण्यातील आंबेगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीतील कात्रजमध्ये भररस्त्यात तीन जणांनी एका तरूणाची क्रूर हत्या केली. जागेच्या वादातून २३ वर्षीय तरूणाची हत्या करण्यात आली. शुभम सुभाष चव्हाण असे मृत तरूणाचे नाव आहे. या घटनेनंतर आंबेगावमध्ये एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांचा धाक राहिला की नाही? असा सवाल उपस्थित केला जातोय. रेकॉर्डवरील गुन्हेगार अमर साकोरे आणि त्याच्या दोन साथीदारांनी मिळून २३ वर्षीय शुभमचा जीव घेतल्याने खळबळ उडाली.

पुण्यातील कात्रज परिसरातील संतोषनगरमध्ये रविवारी ही धक्कादायक घटना घडली. जागेच्या वादातून रेकॉर्डवरील गुन्हेगार अमर साकोरे याने आपल्या दोन साथीदारांसोबत मिळून शुभमचा जीव घेतला. काठी, स्टंप आणि लाकडी दांडक्याने आधी शुभमला बेदम मारहाण करण्यात आली. त्यानंतर दगडानेही गंभीर जखमी केले. या क्रूर हल्ल्यात शुभम याचा जागीच मृत्यू झाला, अशी माहिती आंबेगाव पोलिसांनी दिली.

शुभमच्या अचानक जाण्याने त्याच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. “आमचा शुभम कोणाशीच भांडण करणारा नव्हता. तो सगळ्यांशी प्रेमाने वागायचा. असं कोण क्रूरपणे त्याचा जीव घेईल, यावर विश्वासच बसत नाही,” असे शुभमच्या कुटुंबाने म्हटलेय. पोलिसांकडून शुभमच्या मारेकऱ्याचा शोध घेतला जात आहे. प्राथमिक तपासानुसार, जागेच्या वादातून हे भयंकर कृत्य घडले आहे.

आंबेगाव पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला असून तातडीने तपास सुरू केला आहे. आरोपी अमर साकोरे आणि त्याचे दोन साथीदार सध्या फरार आहेत. त्यांचा पोलीस शोध घेत आहेत. तिघांच्या शोधासाठी पोलिसांनी तीन विशेष पथके तयार केली आहेत. “आम्ही सर्व बाजूंनी तपास करत आहोत. लवकरच आरोपींना ताब्यात घेतले जाईल,” असे आंबेगाव पोलिसांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ashok Kharat Case: मासा पाण्यातील वनस्पती! शाकाहारी लोकांना खायायला लावले मासे, खरातचा बंडलपणा आला समोर

RBI Rules: रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय! ऑनलाइन पेमेंटच्या नियमात बदल; आजपासून काय काय बदललं?

Summer Hair Care : अगदी कमकुवत केससुद्धा दुप्पट वेगाने वाढतील, फक्त १५ दिवस करा 'हा' उपाय

Maharashtra Live News Update: भोंदू अशोक खरातला १४ दिवसांची न्यायलयीन कोठडी

How to store coriander: फ्रीजमध्ये ठेवली तरी कोथिंबीर काळी पडतेय? या टीप्सचा वापर करून पाहा

SCROLL FOR NEXT