nilesh chavan video goes viral pistol on his waist Saam TV News
मुंबई/पुणे

Vaishnavi Hagawane Death : कमरेला पिस्तुल, मित्राच्या खांद्यावर बसून चुम्मा गाण्यावर ठेका; निलेश चव्हाणचा नवा VIDEO व्हायरल

Nilesh Chavan Viral Video : गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या निलेश चव्हाणचा नवा व्हिडिओ समोर आला आहे. कंबरेला बंदूक लावून चव्हाण नाचत असलेला व्हिडिओ समोर आला आहे. सध्या सोशल मिडियावर हा व्हिडीओ चांगलाच चर्चेत आला आहे.

Prashant Patil

पुणे : पुण्यातील वैष्णवी हगवणेच्या आत्महत्येनंतर तिच्या ९ महिन्याच्या बाळाची हेळसांड केल्याप्रकरणी निलेश चव्हाणवर अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कर्वेनगर परिसरातील रहिवासी निलेश चव्हाण याच्याविरुद्ध वारजे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. कस्पटे कुटुंबीय जेव्हा वैष्णवीच्या मुलाला घेण्यासाठी गेले तेव्हा निलेश चव्हाणने बंदूक दाखवून धमकावल्याचा आरोप करण्यात आला होता. अशातच आता पिस्तुलबाज निलेश चव्हाणचा कमरेला पिस्तुल लावून नाचतानाचा एक व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडीओ सध्या चांगलाच चर्चेत आला आहे. निलेश चव्हाण यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी देखील आहे. अगोदर देखील त्याच्यावर गुन्हे दाखल झालेले आहेत. ड्रंक अँड ड्राइव्ह केसही दाखल आहे.

पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी याबाबत बोलताना सांगितलं की, 'वारजेमध्ये गुन्हा दाखल आहे. धमकीचा गुन्हा दाखल केला आपल्या तपासात काही आढळून आलं आहे. त्याच्याकडे रिव्हॉल्व्हर आहे. निलेश चव्हाण आणि हगवणे यांचे लायसन रद्द करण्याचा प्रस्ताव दिला आहे. निलेश चव्हाण प्रकरणी नातेवाईकांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलं आहे. ज्या ठिकाणी घटना घडली त्या ठिकाणी पंचनामे करत छापेमारी केली आहे. लॅपटॉप जप्त केला आहे. त्याच्या वडिलांना आणि भावाला चौकशीसाठी बोलावलं आहे. जे-जे लोक त्या दिवशी प्रत्यक्षदर्शी होते, ज्या दिवशी कस्पटे यांना धमकी दिली. त्या सर्वांना चौकशीसाठी बोलवू' असंही संभाजी कदम यांनी म्हटलं आहे. तर त्याला कायदाप्रमाणे नोटीस दिली आहे. त्याच्या भावाला नोटीस दिली आहे. चौकशीसाठी सहकार्य नाही केलं किंवा आला नाही तर कायदेशीर कारवाई करू अशी नोटीस दिल्याची माहिती आहे.

गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या निलेश चव्हाणचा नवा व्हिडिओ समोर आला आहे. कंबरेला बंदूक लावून चव्हाण नाचत असलेला व्हिडिओ समोर आला आहे. सध्या सोशल मिडियावर हा व्हिडीओ चांगलाच चर्चेत आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये कार्यकर्त्यांची इच्छा - नितेश राणे

7 minutes after death: मृत्यूनंतर 7 मिनिटांत काय घडतं? पाहा वैज्ञानिक दृष्टीकोनातून समोर आलेल्या धक्कादायक गोष्टी

GK: महिलांनी साष्टांग नमस्कार का टाळावा? काय आहे यामागचं शास्त्रीय कारण

Pune: रेव्ह पार्टीचा 1:42 मिनिटाचा INSIDE VIDEO समोर; २ तरूणी अन् मित्रांसोबत खडसेंचा जावई नशेन धुत

Akola News : लग्नाचं आमिष दाखवतं कॅफेत घेऊन गेला; २९ वर्षीय तरुणाचे ३३ वर्षीय महिलेवर अत्याचार

SCROLL FOR NEXT