pune news Saam tv
मुंबई/पुणे

Pune Crime : धक्कादायक! घरगुती सिलिंडरमधून छोट्या सिलिंडरमध्ये भरायचे गॅस; पोलिसांनी रॅकेटचा असा केला पर्दाफाश

Pune Crime News : घरगुती सिलिंडरमधून छोट्या सिलिंडरमध्ये गॅस भरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश पोलिसांनी केला आहे. काळेपडळ पोलिसांनी ही कारवाई केली आहे .

Vishal Gangurde

सागर आव्हाड, साम टीव्ही

पुणे : घरगुती गॅस सिलिंडरमधून दुसऱ्या छोट्या सिलिंडरमध्ये गॅस भरून त्याची विक्री करणाऱ्या तरुणाला काळेपडळ पोलिसांनी अटक केली. हांडेवाडी परिसरातून ८० सिलिंडरसह इतर मुद्देमाल जप्त केला आहे. विक्रांत राजकुमार जाधव (वय २२, रा. ससाणेनगर, हडपसर) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हडपसरमधील हांडेवाडी रस्त्यावरील एका सोसायटीसमोरील पत्र्याच्या शेडमध्ये घरगुती गॅस सिलिंडरमधून दुसऱ्या लहान सिलिंडरमध्ये धोकादायक पद्धतीने गॅस भरण्यात येत असल्याची माहिती पोलिस अंमलदार अतुल पंधरकर यांना मिळाली. ही बाब त्यांनी वरिष्ठांना कळवली.

पोलिस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्त धन्यकुमार गोडसे, काळेपडळ ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मानसिंग पाटील, पोलिस निरीक्षक (गुन्हे) अमर काळंगे, सहाय्यक निरीक्षक अमित शेटे, पोलिस अंमलदार प्रवीण काळभोर, अतुल पंधरकर, महादेव शिंदे, सद्दाम तांबोळी यांच्या पथकाने त्याठिकाणी मंगळवारी (ता. १८) दुपारी एक वाजण्याच्या सुमारास छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी ८० गॅस सिलिंडर आणि इतर साहित्य असा मुद्देमाल जप्त केला आहे.

पुण्यात तरुणीला ब्लॅकमेल करून खंडणी मागण्याचा प्रकार

पुण्यात सोशल मीडियावर नग्न फोटो प्रसारित करण्याची धमकी देत ब्लॅकमेल करून खंडणी मागण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी पुणे एका किशोरवीयन मुलाला अटक केली आहे. फोटो व्हायरल करायचे नसतील तर, 2 हजार रुपये दे, अशा इशारा आरोपीने पीडित तरुणीला दिला होता. त्याचबरोबर एडिट केलेले नको ते फोटो पिडितेच्या भावालाही पाठवल्याचं या प्रकरणात समोर वानवडी पोलिसांनी कारवाई केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: धान उत्पादक आक्रमक! भंडाराच्या साकोलीत शेतकऱ्यांचा धडक ट्रॅक्टर मोर्चा..

अभिजीत दीपके अन् आशुतोष रांका यांना अटक होणार; ट्विटने खळबळ

Chanakya Niti: लग्नाआधी जोडीदार निवडताना या 7 गोष्टी नक्की तपासा; नाहीतर नंतर पश्चात्ताप होऊ शकतो

Kitchen Safety Tips: गॅस- स्टोव्हच्या जवळ 6 वस्तू ठेवणे टाळा, वास्तुशास्तानुसार ठरू शकते घातक

Ginger Tea : रोज आल्याचा चहा पिता? थांबा! ५ गंभीर दुष्परिणाम वाचताच 'ही' सवय सोडाल

SCROLL FOR NEXT