Gautami Patil  Saam TV
मुंबई/पुणे

Gautami Patil Program News: महिलांच्या हाती काठ्या अन् दांडकी... असं काय घडलं गौतमीच्या कार्यक्रमात

Gautami Patil Lavani News: गौतमी पाटीलचा कार्यक्रम म्हटलं की राडा हे समीकरण ठरलेलच

रोहिदास गाडगे

Gautami Patil Viral News : गौतमी पाटीलचा कार्यक्रम म्हटलं की राडा हे समीकरण ठरलेलच आहे. या राड्यामुळे तरुणाईमध्ये चांगलीच खडाजंगी अनेक वेळा पहायला मिळते. यामुळे गौतमी बरोबर गावचं नावही खराब होत असल्याने आता गौतमीचा राडा आणि तरुणाईचा धुडघुस रोखण्यासाठी गावपुढाऱ्यांसह महिलांनीही पुढाकार घेतला आहे. (Latest Marathi News)

जुन्नर (Junnar)तालुक्यातील फुलांचे गाव म्हणून ओळख असलेल्या निमदरी पिराचीवाडी येथे वेताळेश्वर महाराजांच्या यात्रा उत्सवानिमित्ताने गौतमी पाटीलच्या (Gautami Patil) कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पंचक्रोशीतील असंख्य तरुणाई महिलावर्गासह चिमुकली मुलं दाखल झाली होती.

यावेळी कार्यक्रम सुरळीत पार पडावा यासाठी गावपुढाऱ्यांनी एक अनोखी शक्कल लढवली. महिलांच्या हातात काठ्या दांडकी घेऊन उभं करत चोख बंदोबस्त लावला इतरच काय तर गौतमीचे सुरक्षा रक्षक त्यात २५ जणांची आधिकची वाढ करुन तगडा बंदोबस्त तैनात करत गौतमीचा डिजे शो रंगला.

कार्यक्रम रंगात येताच गावकऱ्यांनी स्टेजच्या समोरील बाजुस तरुणांच्या गर्दीला आवर घालण्यासाठी महिला रसिकांना बसविण्यात आले. त्यामुळे गौतमीच्या कार्यक्रमात ठरवून राडा धुडघुस घालणाऱ्यांना आळा बसला आणि कार्यक्रम सुरळीत पार पडला.

आजकाल गौतमीच्या आदाकारीवर तरुणाईसह महिला चिमुकले चांगलेच थिरकतात. मात्र कार्यक्रमातला राडा रोखण्यासाठी गावपुढारीच आता काळजी घेऊ लागल्याने गौतमीचे कार्यक्रम सुरळीत पार पडत असल्याचे वेगळं चित्र पहायला मिळत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : ऊस दराच्या मागणीसाठी शेतकरी संघटनांचा दिल्लीत एल्गार; आज जंतर-मंतरवर आंदोलन

Garba Jhumka Designs : नवरात्रीत घाला 'हे' ८ ट्रेंडी डिझाइनचे झुमके, गरबा लूक दिसेल एकदम हटके

Kidney Health: राजमा खाल्ल्याने किडनी खरोखरच दुरुस्त होते का? 'हा' धक्कादायक खुलासा वाचून चकित व्हाल

Amla juice: सकाळी रिकाम्या पोटी प्या एक ग्लास आवळ्याचा रस; मिळतील हे 4 फायदे

Mumbai Crime: गार्डमध्ये जाऊन ड्रग्जचं इंजेक्शन घेतलं, मुंबईत तरुणाचा तडफडून मृत्यू

SCROLL FOR NEXT