Ashok Jain businessman news Saam TV
मुंबई/पुणे

पुण्यात खळबळ, हॉटेलच्या खोलीत आढळला प्रसिद्ध व्यावसायिकाचा मृतदेह, हत्या की घातपात?

Ashok Jain businessman news : पुण्यातील उद्योजक अशोक जैन यांचा मृतदेह आपटे रोडवरील हॉटेलमध्ये आढळल्याने खळबळ उडाली आहे. पोलिसांना सुसाईड नोट सापडली असून आत्महत्या की घातपात याचा तपास सुरू आहे.

Namdeo Kumbhar

सचिन जाधव, पुणे प्रितिनिधी

पुण्यात हॉटेलात एका प्रसिद्ध उद्योजक अशोक जैन यांचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास करण्यात येत आहे. अशोक जैन यांनी आत्महत्या केली की घातपात झाला? अशी चर्चा पुण्यात सुरू आहे. अशोक मिलापचंद जैन (वय ६१) हे पुण्यातील सॅलिसबरी पार्क परिसरातील उद्योजक आहेत. त्यांचा मृतदेह आपटे रस्त्यावरील एका हॉटेलमध्ये शनिवारी दुपारी आढळला.त्यांनी विषप्राशन करून आत्महत्या केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

अशोक जैन शुक्रवारी घरातून बाहेर पडले होते, त्यानंतर त्यांचा कुटुंबीयांशी कोणताही संपर्क होऊ शकला नाही. त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांनी शुक्रवारी सायंकाळी स्वारगेट पोलीस ठाण्यात ते बेपत्ता असल्याची (मिसिंग) तक्रार नोंदवली होती. शनिवारी दुपारी आपटे रोडवरील एका हॉटेलमधील कर्मचाऱ्यांनी डेक्कन पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन दरवाजा उघडला असता, जैन मृतावस्थेत आढळले.

पोलिसांना खोलीत ठिकठिकाणी उलट्या झाल्याचे दिसून आले. त्यावरून त्यांनी विषप्राशन केल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. पोलिसांना घटनास्थळी एक चिठ्ठी (सुसाईड नोट) सापडली असून ती जैन यांनीच लिहिल्याचा संशय आहे. या पत्रातील मजकुराच्या आधारे पोलीस आत्महत्येमागचे नेमके कारण शोधत आहेत. सध्या डेक्कन पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

उद्योजक अशोक जैन यांनी आत्महत्या केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा कसून तपास केला जात आहे. अशोक जैन यांनी राजीनामा का दिला? त्यामागे काय कारणे आहेत? याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे. पोलिसांनी जैन यांचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवला आहे. जैन यांच्या कुटुंबियांकडे विचारपूस आणि चौकशी पोलिसांकडून केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kalyan : ईईssssss....आईस्क्रीममध्ये आढळली सापाच्या पिल्लाएवढी कीड, खाण्याआधी दहा वेळा विचार करा!

Moti Mangalsutra Designs: वटपौर्णिमेला खास लूक हवा? मोती मंगळसूत्राच्या या 7 ट्रेंडी सुंदर डिझाइन्स नक्की पाहा

Maharashtra News Live Update: परभणी जिल्ह्यातील विविध ठिकाणी जोरदार पावसाची हजेरी

पब्लिक ट्रान्सपोर्टमधला जबरदस्त चमत्कार! एकाच स्टेशनवर थांबणार मोनो, मेट्रो आणि मुंबई लोकल

Chanakya Niti: ही ५ ठिकाणं, तिथं कंजूषपणे वागा; कधीच होणार नाही पाकीट रिकामं, बँक बॅलन्स तर कडकच!

SCROLL FOR NEXT