crime News Saam Tv
मुंबई/पुणे

Pune : पुणे हादरले! महिलेला जबरदस्ती रिक्षातून नेलं, सामूहिक बलात्कार केला अन्...

Pune crime statistics : पुण्यात महिलेला जबरदस्ती रिक्षात नेऊन सामूहिक बलात्कार करून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलिसांनी तिघा आरोपींना अटक करून तपास सुरू केला आहे.

Akshay Badve

Pune Crime News : पुण्यामध्ये एका महिलेवर सामूहिक बलात्कार केल्याची (gangrape case Pune) धक्कादायक घटना घडली आहे. एका महिलेला जबरदस्ती रिक्षात बसवले अन् तिच्यावर ३ जणांनी आळीपाळीने बलात्कार केला. बलात्कारानंतर नराधमांनी महिलेची हत्या केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. पुण्यातील भारती विद्यापीठ (Bharati Vidyapeeth crime) पोलीस स्टेशन अंतर्गत ही धक्कादायक घटना घडली. या प्रकारानंतर पुण्यात एकच खळबळ उडाली आहे. पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल होताच आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत.

महिलेवर आधी बलात्कार करून तिला दगडाच्या खाणीत ढकलून खून करण्यात आला असल्याची माहिती देण्यात आली आहे. या गुन्ह्यातील तीनही आरोपी रेकॉर्ड वरील गुन्हेगार असून त्यांना अटक करण्यात आली आहे. महिलेला दगडाच्या खाणीत ढकलून हत्या करण्यात आली. प्राथमिक माहितीनुसार, आरोपींनी या महिलेला जबरदस्तीने रिक्षात बसवून निर्जन स्थळी नेले. तिला काठीने मारहाण केली आणि नंतर एकाने तिला खाणीत ढकलून दिले. सीसीटीव्हीमधे ओळखले जाऊ नये म्हणून आरोपींनी रिक्षाचे हूड देखील बदलले होते. या प्रकरणात भारती विद्यापीठ पोलीस आणि गुन्हे शाखा दोघांनी तपास केला आणि अखेर गुन्हे शाखेने तिघांना अटक केली आहे.

महिलेवर सामूहिक बलात्कार करून हत्या कऱण्यात आल्याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी तिन्ही आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. घटनास्थळावर पंचनामा करत पोलिसांनी महिलेचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवला आहे. त्या महिलेची ओळख पटवण्यात येत आहे. भारती विद्यापीठ परिसरात ही घटना घडल्याने पुण्यात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत आरोपींना तात्काळ अटक केली आहे. आरोपांची पोलिसांकडून कसून चौकशी करण्यात येत आहे. आरोपींवर याआधीही गंभीर गुन्हे दाखल आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: भिवंडीच्या मूलचंद कंपाऊंडमध्ये ऑइलच्या गोदामाला भीषण आग

High Blood Pressure : हाय BP च्या रुग्णांसाठी 'हा' ज्यूस ठरतो वरदान, आताच डाएटमध्ये करा समावेश

Weight Loss Diet: डाएटमध्ये भाकरीसोबत खा ही एक भाजी, फॅट होईल ७ दिवसातच कमी

Maharashtra Government: राज्य सरकारचा मोठा निर्णय! सरकारी कर्मचाऱ्यांसाठीचा २२ वर्षांपूर्वीचा नियम बदलला

Sambhajinagar: ट्रॅफिक पोलिसाला भरचौकात मारहाण, आधी शिवीगाळ नंतर कॉलर पकडून कानशिलात लगावली; VIDEO समोर

SCROLL FOR NEXT