Pune Holiday Saam Tv
मुंबई/पुणे

Pune Holiday: महत्त्वाची बातमी! पुण्यातील शाळा आज बंद, सरकारी कार्यालयांनाही सुट्टी

Pune Holiday Today For Gauri Pujan: आज पुणे जिल्ह्यातील शासकीय आणि निमशासकीय तसेच शाळेांना सुट्टी असणार आहे. गौरी पुजननिमित्त पुणे जिल्ह्यातील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

Siddhi Hande

पुण्यात आज शाळांना आणि सरकारी कार्यालयांना सुट्टी

गौरी पुजननिमित्त सुट्टी जाहीर

घटस्थापना आणि नरक चतुर्दशीलाही सुट्टी

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. २०२५ साठी पुणे जिल्ह्यातील शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांसाठी तसेच शाळांसाठी सुट्ट्यांची घोषणा करण्यात आली आहे. या वर्षात किती दिवस सुट्ट्या असणार आहेत याबाबत माहिती दिली आहे. विभागीय आयुक्य पुणे विभाग डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी केली. शासन, सामान्य प्रशासन विभागाने १४ मार्च १९८३ रोजी काढलेल्या अधिसूचनेतील तरतुदीनुसार प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून हा आदेश करण्यात आला आहे.

या नवीन आदेशानुसार, जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांना आणि शालेय विद्यार्थ्यांना गौरीपूजन, घटस्थापना आणि नरक चतुदर्शीच्या दिवशी सुट्टी मिळणार आहे. सणासुदीच्या दिवशी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

या नवीन जाहीर केलेल्या सुट्ट्यांमध्ये सोमवार १ सप्टेंबर म्हणजे आज गौरीपूजनचा समावेश आहे. आज पुण्यातील शासकीय कर्मचाऱ्यांना आणि शालेय विद्यार्थ्यांना सुट्टी असणार आहे.यानंतर सोमवार, दि. २२ सप्टेंबर २०२५ रोजी घटस्थापना २० ऑक्टोबर २०२५ रोजी नरक चतुर्दशीच्या दिवशी कर्मचाऱ्यांना आणि विद्यार्थ्यांना सुट्टी असणार आहे.

सप्टेंबरमध्ये शासकीय सुट्ट्या

सप्टेंबर महिन्यात अनेक सण उत्सव आहेत त्यामुळे अनेक दिवस सुट्ट्या असणार आहे. महाराष्ट्रात गणेशोत्सव, ईद, ओणम आणि नवरात्रीमध्ये सुट्ट्या असणार आहेत. त्यामुळे या महिन्यात वीकेंड सोडूनदेखील अनेक दिवस सुट्ट्या मिळणार आहेत. यानंतर पुढच्या महिन्यातदेखील सुट्ट्या असणार आहे. पुढच्या महिन्यात दिवाळी असणार आहे त्यामुळे सुट्ट्या असणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पालघारमधील अनेक माजी नगरसेवकाचा शिवसेनेत प्रवेश, शिंदेंची ताकद वाढली

व्होटचोरीच्या मुद्द्यावर विरोधक आक्रमक; विरोधकांकडून आयोगावर प्रश्नांची सरबत्ती , बैठकीत नेमकं काय घडलं?

4 zodiac signs: बुधवारी व्यापार-शिक्षणात यश, अष्टमीला देवीची कृपा; जाणून घ्या लाभदायी 4 राशी

Maharashtra Rain Alert : राज्यातील काही जिल्ह्यांना यल्लो अलर्ट, जाणून घ्या कुठे कसा पडणार पाऊस

Dombivli Crime : मुलीला एकटीला पाहून नियत फिरली, घरातच राहणाऱ्या नराधमाचे लज्जास्पद कृत्य, डोंबिवलीत संतापजनक घटना

SCROLL FOR NEXT