Hinjewadi Shivajinagar Metro route latest update saam tv
मुंबई/पुणे

पुण्यात मेट्रो प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आणखी दोन स्थानके आजपासून सुरू

Balewadi High Street Metro Station Opening Time: पुणेकरांसाठी आनंदाची बातमी! हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो मार्गावरील बालेवाडी हायस्ट्रीट आणि बालेवाडी फाटा ही दोन स्थानके आजपासून सुरू होणार आहेत.

Omkar Sonawane

सचिन जाधव, साम टीव्ही

पुणे : हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. या मार्गावरील बालेवाडी हायस्ट्रीट आणि बालेवाडी फाटा ही दोन मेट्रो स्थानके आजपासून प्रवाशांसाठी खुली होणार आहेत. दुपारी ३.३० वाजल्यापासून या दोन्ही स्थानकांवरून मेट्रो सेवा सुरू होणार आहे. त्यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो मार्गाचे उद्घाटन ३ नोव्हेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाइन पद्धतीने करण्यात आले होते. त्यानंतर दुसऱ्या दिवसापासून या मार्गावर मेट्रो वाहतूक सुरू झाली. पहिल्या टप्प्यात २३ पैकी १७ स्थानकांवरून प्रवाशांची वाहतूक सुरू करण्यात आली होती.

दरम्यान, बालेवाडी हायस्ट्रीट आणि बालेवाडी फाटा या दोन स्थानकांना रेल्वे सुरक्षा मंडळाची मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे बुधवारपासून ही दोन्ही स्थानके प्रवाशांसाठी खुली करण्यात येणार आहेत. या दोन स्थानकांच्या सुरू होण्यामुळे हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो मार्गावरील कार्यान्वित स्थानकांची संख्या आता १९ वर पोहोचणार आहे.

उर्वरित चार स्थानकेही लवकरच सुरू करण्यात येणार असल्याची माहिती आहे. दरम्यान, या मेट्रो मार्गाला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत असून, सध्या दररोज सुमारे ५० हजार प्रवासी या मार्गावरून प्रवास करत आहेत. त्यामुळे आणखी दोन स्थानके सुरू झाल्याने प्रवाशांची सोय होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: फ्लेक्स लावून विद्रूपीकरण करणाऱ्या 8 जणांवर गुन्हा दाखल

Weather Update: पाऊस पुन्हा धुमाकूळ घालणार, ७ राज्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज; ताशी ५० ते ६० किमी वेगाने वारे वाहणार

निवडणुकीआधी विरोधी पक्षाचा मोठा डाव! उमेदवारांची यादी जाहीर; कुणाला मिळाली संधी, कुणाचा पत्ता कट?

आइस्क्रीमचं आमिष अन् ५ लाखांची खंडणी! १२ वर्षीय मुलासोबत काय घडलं?

Wednesday Horoscope: बुधवार ठरणार खास! या ५ राशींना मिळणार मोठी आनंदाची बातमी; महादेवाची विशेष कृपा

SCROLL FOR NEXT