New Amrit Bharat Express to connect Pune with Varanasi, boosting rail connectivity to North India Saam TV Marathi News
मुंबई/पुणे

पुण्यातून धावणार आणखी एक एक्सप्रेस, कोणत्या स्थानकावर थांबणार? किती असणार तिकिट? वाचा A टू Z माहिती

Pune to Varanasi train time table : पुण्याहून वाराणसीसाठी अमृत भारत एक्सप्रेस २४ एप्रिलपासून सुरू होणार आहे. एक्सप्रेस ट्रेन कोणत्या स्थानकावर थांबणार? तिकीटाचे दर किती असतील? याबाबतची सर्व माहिती जाणून घ्या...

Namdeo Kumbhar

Pune Amrit Bharat Express train Update : आता पुणे उत्तर भारताला जोडलं जाणार आहे. होय, कारण पुण्याहून उत्तर भारतासाठी दररोज ट्रेन सुरू करण्यात आली आहे. हडपसर (पुणे)-बनारस (वाराणसी) या मार्गावर अमृत भारत एक्सप्रेसला मंजुरी देण्यात आली आहे. २४ एप्रिलपासून पुणे-बनारस ही अमृत भारत एक्सप्रेस धावणार आहे. त्याशिवाय पुणे-जबलपूर ही विशेष धावणारी ट्रेन आता नियमित करण्यात आली आहे. या दोन एक्सप्रेस ट्रेनमुळे (Amrit Bharat Express train between Hadapsar and Banaras (Varanasi)) पुणे आणि उत्तर भारत आणखी जवळ येणार आहे.

अमृत भारत एक्सप्रेस ट्रेन ( Hadapsar–Banaras Amrit Bharat Express) पुण्यातील हडपसर टर्मिनलहून सुटणार आहे. यामुळे पुणे रेल्वे स्थानकावरील गर्दी कमी होण्यास मदत मिळणार आहे. सोमवारी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी नव्या अमृत भारत एक्सप्रेसबाबतराज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांना हा अधिकृत पत्र पाठवत माहिती दिली. नव्या ट्रेनमुळे पुणे रेल्वे स्थानकावरील गर्दी कमी होईलट. प्रवाशांना थेट आणि जलद कनेक्टिव्हिटी मिळण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. शुक्रवारपासून पुण्यातील हडपसर येथून वाराणसीसाठी अमृत भारत एक्सप्रेस धावेल.

पुणे आणि उत्तर भारत दरम्यान रेल्वे कनेक्टिव्हिटीची मागणी मागील काही वर्षांपासून केली जात होती. तीर्थयात्रेला जाणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांसाठी ही एक्सप्रेस फायद्याची ठरणार आहे. अमृत भारत एक्सप्रेसला मंजुरी मिळाल्याने आणि पुणे-जबलपूर ट्रेन नियमित झाल्याने लाखो प्रवाशांच्या दीर्घकाळापासूनच्या आकांक्षा पूर्ण झाल्या आहेत.
- मुरलीधर मोहोळ, राज्यमंत्री

अमृत ​​भारत एक्सप्रेसची वैशिष्ट्ये काय ?

अमृत ​​भारत एक्सप्रेस ही लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी बनवलेली ट्रेन आहे. या ट्रेनमध्ये स्लीपर आणि जनरल क्लासच्या डब्यांसह एकूण २२ डबे असतील. यामध्ये दिव्यांग प्रवाशांसाठी खास तयार केलेले सामान-सह-गार्ड डबे देखील आहेत. सुरक्षा वैशिष्ट्यांमध्ये सीसीटीव्ही, आग शोध प्रणाली आणि सुधारित अपघात संरक्षण यंत्रणा यांचा समावेश आहे. वंदे भारत एक्सप्रेसमुळे आरामदायी अन् वेगात होणार आहे. त्याशिवाय याचं तिकीटही सर्वसामान्यांच्या अवाक्यात असेल.

कोणत्या स्थानकावर अमृत भारत एक्सप्रेस थांबणार ?

हडपसर-बनारस अमृत भारत एक्सप्रेसचे सविस्तर वेळापत्रक, थांबे आणि बुकिंगच्या तारखा अद्याप जाहीर झाल्या नाहीत. लवकरच रेल्वेकडून याची सविस्तर माहिती जाहीर केली जाणार आहे.

हडपसर (पुणे), दौंड , मनमाड जंक्शन, भुसावळ जंक्शन,खंडवा, इटारसी जंक्शन,जबलपूर, कटनी जंक्शन, प्रयागराज जंक्शन आणि बनारस (वाराणसी) या स्थानकावर गाडी थांबण्याची शक्यता आहे.

अमृत भारत एक्सप्रेसचे किती असणार तिकीट ?

हडपसर ते बनारस हे अंतर अंदाजे १४५० ते १५५० किमी या दरम्यान आहे. या ट्रेनचे स्लीपर क्लासचे (Sleeper Class) तिकीट ६५० त ७५० या दरम्यान असेल. तर जनरलचे तिकीट ३५० ते ४५० रूपये यादरम्यान असू शकते. अमृत भारत एक्सप्रेसचे तिकीट हे सामान्य मेल/एक्सप्रेस गाड्यांपेक्षा साधारण १५% ते १७% जास्त आहे, कारण यामध्ये वेगवान प्रवास आणि आधुनिक सुविधा (उदा. सीसीटीव्ही, चार्जिंग पॉइंट्स, चांगले टॉयलेट्स) दिल्या जातात.

पुणे-जबलपूर आता कायमस्वरूपी धावणार -

पुणे-जबलपूर विशेष गाडी (०२१३१/०२१३२) आता कायमस्वरूपी २०१९१/२०१९२ या नवीन क्रमांकाने पुणे-जबलपूर एक्सप्रेस म्हणून धावणार आहे. केंद्रीय रेल्वे बोर्डाकडून याला मान्यता देण्यात आली आहे. या बदलामुळे वर्षभर आगाऊ आरक्षण करणे सोपे होणार आहे. त्याशिवाय विशेष गाड्यांशी संबंधित असलेले जास्त भाडे कमी होऊन प्रवाशांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: लातूरमध्ये उष्माघाताचा पहिला बळी

Health warning signs: किडनी आणि लिव्हर खराब झाल्यानंतर शरीरात दिसतात हे बदल; डॉक्टरांनी सांगितली महत्त्वाची माहिती

Pune Summer Tourism: सहलीला जायाचा...! उकाड्यापासून सुटका हवीये? पुण्याजवळच्या 8 थंडगार ठिकाणी, लगेच प्लान करा

Maharashtra Politics: महिला आरक्षण विधेयकाआडून देश तोडण्याचा डाव, उद्धव ठाकरे यांच्याकडून सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल

Kairi Chutney Recipe: भाजलेल्या कैरीची 'चटपटीत' आंबट- गोड चटणी, अवघ्या १० मिनिटांत बनवा, नोट करा 'ही' रेसिपी

SCROLL FOR NEXT