Pune Hadpasar News Saam tv
मुंबई/पुणे

Pune : पुण्यात धक्कादायक प्रकार! व्हॉट्सॲपवर ग्रुप जॉईन करणं पडलं महागात, बँक खात्यातील १२ कोटी गायब

Pune Hadpasar News : पुण्यातील हडपसर भागातील ७५ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाला शेअर बाजारातील गुंतवणुकीच्या आमिषाने सायबर चोरट्यांनी तब्बल १२ कोटी ३१ लाखांची फसवणूक केली. पोलीस तपास सुरु आहे.

Akshay Badve

  • पुण्यातील हडपसरमध्ये ७५ वर्षीय व्यक्तीची मोठी सायबर फसवणूक

  • शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने १२ कोटींहून अधिक रक्कम लुबाडली

  • WhatsApp ग्रुपद्वारे सायबर चोरट्यांनी जाळे पसरवले

  • पोलिसांकडून पुढील तपास सुरू

पुण्यातील हडपसर भागातील ७५ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाची सायबर चोरट्यांनी तब्बल १२ कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शेअर बाजारात चांगला परतावा मिळवून देतो असे भासवून ११ दिवसात ५४ कोटी रुपये मिळतील या अमिषाला बळी पडत ज्येष्ठ नागरिकाने तब्बल १२ कोटी रुपये गमावले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ७५ वर्षाचे असून पुण्यातील हडपसर भागात वास्तव्यास असून ते निवृत्त व्यावसायिक आहेत. फिर्यादी यांना जानेवारी महिन्यात एका अनोळखी नंबर वरून मेसेज आला. शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल असं आमिष त्यामध्ये त्यांना दाखवण्यात आलं. या अमिषाला बळी पडल्यानंतर सायबर चोरट्यांनी त्यांना एका व्हॉट्सॲप ग्रुप मध्ये सहभागी केलं.

"व्हि आय पी स्टॉक २४" असं या ग्रुपला नाव देण्यात आलं होतं. या मधून चोरट्यांनी त्यांना शेअर बाजारातील गुंतवणूक योजनांची माहिती दिली. जाळ्यात ओढल्यानंतर चोरट्यांनी त्यांना ११ दिवसात ५४ कोटी रुपये मिळवून देऊ असं आकर्षक आमिष दाखवलं गेलं. या नंतर फिर्यादी यांनी ३ महिन्यात सायबर चोरट्यांनी सांगितलेल्या वेगवेगळ्या वेळेला ८ बँक खात्यांमध्ये पैसे भरले. शेअर बाजारात गुंतवणुकीच्या बहाण्याने चोरट्यांनी त्यांच्याकडून तीन महिन्यात वेळोवेळी १२ कोटी ३१ लाख रुपये लुबाडले. या प्रकरणी पोलीस तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Satara Tourism : महाराष्ट्रातील 'फुलांची दरी' पाहिली का? पावसाळ्यात पाहायला मिळतो निसर्गाचा रंगीबेरंगी चमत्कार

Maharashtra News Live Update: गडचिरोलीत 14 आत्मसमर्पित माओवाद्यांना भुखंड वाटप

भाजप नेत्याचं शिंदेसेनेला खळबळजनक पत्र; मित्रपक्षाला सत्तेतून बाहेर काढण्याची मागणी

सोलापूरकरांना मोठा दिलासा! जुना पुणे नाका-बोरामणी नाका उन्नत मार्गामुळे वाहतूक कोंडी सुटणार

India squad announced : टी २० मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा, कुणाला पुन्हा संधी, कुणाचं कमबॅक?

SCROLL FOR NEXT