Harshada Deshmukh Saam Tv
मुंबई/पुणे

Pune MLC Election Result: पुणे पदवीधर निवडणुकीत राष्ट्रवादीच्या हर्षदा देशमुख यांचा विजय निश्चित, भाजपच्या स्मिता जाधव यांना टाकलं मागं

Pune Graduate Constituency Election: पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत हर्षदा देशमुख यांचा विजय झाला आहे. औपचारिक घोषणा करणं अजून बाकी आहे.

Priya More
  • पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीचा निकाल

  • हर्षदा देशमुख यांचा पुणे पदवीधर निवडणुकीत विजय

  • भाजपच्या स्मिता जाधव यांना हर्षदा देशमुख यांनी टाकले मागे

पुणे पदवीधर मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवार हर्षदा देशमुख यांचा विजय निश्चित झाला आहे. त्यांना १ लाख ११४२५ मतं मिळाली आहेत. भाजपच्या उमेदवार स्मिता जाधव यांचा पराभव झाला. त्यांना ३०व्या फेरी अखेर १ लाख २५५४ मतं मिळाली आहेत. तर शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार सुनील मोदी यांना ३००० मतं त्यांना मिळाली. त्यामुळे मोदींचे डिपॉझिट जप्त होण्याची शक्यता आहे. हर्षदा देशमुख यांची दुसऱ्या पसंतीच्या १००० मतदान कोटा पूर्ण करण्यासाठी घोडदोड सुरू आहे. सायंकाळी ५ वाजेपर्यंत त्यांच्या विजयाची घोषणा निवडणूक आयोगाकडून केली जाणार आहे.

पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या मतमोजणीकडे सर्वांचे लक्ष लागले असून हर्षदा जाधव यांच्या उमेदवारीची चर्चा सुरू आहे. मतमोजणीतील कल आणि उमेदवारांना मिळणाऱ्या मतांच्या आकडेवारीवरून विजयाचे चित्र स्पष्ट होणार आहे. दुसरीकडे, शिवसेनेच्या उमेदवाराची कामगिरी अपेक्षेप्रमाणे न झाल्यास अनामत रक्कम जप्त होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, याबाबत अंतिम निष्कर्ष काढण्यासाठी अधिकृत मतमोजणीची आकडेवारी आणि वैध मतांची संख्या तपासणे आवश्यक आहे. निवडणुकीचा अंतिम निकाल जाहीर झाल्यानंतरच हर्षदा जाधव यांच्या विजयावर आणि शिवसेनेच्या उमेदवाराच्या अनामत रकमेबाबत स्पष्टता येणार आहे.

पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या हर्षदा देशमुख-जाधव यांनी भाजपच्या स्मिता जाधव यांचा पराभव केल्यानंतर सोलापुरात समर्थकांकडून जल्लोष करण्यात येत आहे. सोलापुरातील आंबेडकर चौकात हर्षदा देशमुख यांच्या समर्थक आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत फटाके फोडले. त्याचसोबत एकमेकांना पेढे भरवण्यात आले. दरम्यान, पदवीधर मतदारसंघाची मतमोजीणी होत असताना मतपत्रिकेत एक चिठ्ठी सापडली. त्यामध्ये पदवीधरांच्या लग्नाचा विषय हाती घ्या असे लिहिण्यात आले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: शरद पवार उद्यापासून दुष्काळग्रस्तांशी संवाद साधणार

PM Kisan Yojana : शेतकऱ्यांच्या खात्यात ३० ऑक्टोबरला ₹२,००० येणार? २४व्या हप्त्याबाबत महत्त्वाची माहिती

Lip Care: ओठ कोरडे आणि काळे पडलेत? मग घरी तयार करुन लावा 'हा' लिप बम, ओठ राहतील मऊ आणि मुलायम

मावळमध्ये डंपरच्या धडकेने ग्रामस्थाचा मृत्यू; संतप्त ग्रामस्थांचे 'चक्का जाम' आंदोलन

Vastu Tips: तुम्हीही धुतलेले कपडे रात्रीच्या वेळी खिडकीबाहेर वाळत घालता? वास्तूशास्त्रानुसार ही चूक पडू शकते महागात

SCROLL FOR NEXT