Pune Ashramshala saam
मुंबई/पुणे

Pune Ashramshala: आश्रमशाळेत मुलांच्या जिवाशी खेळ; विद्यार्थ्यांच्या दुधात आढळल्या जिवंत अळ्या

Pune Ashramshala: पुण्याच्या घोडेगाव येथील आश्रम शाळेत विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या दुधात चक्क जिवंत अळ्या आढळून आल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या जिवाशी खेळ सुरू आहे का असा सवाल विचारला जात आहे.

Girish Nikam

राज्यात पोषण आहाराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ सुरु आहे. पुण्याच्या घोडेगाव येथील आश्रम शाळेत विद्यार्थ्यांना दिल्या जाणा-या दुधात चक्क जिवंत अळ्या आढळून आल्यात. गंभीर बाब म्हणजे यापूर्वी राज्यात काही ठिकाणी पोषण आहारात साप, झुरळ, बेडूक आढळलं आहे. पाहूया यावरचा सामचा एक विशेष रिपोर्ट.

शाळेत किंवा आश्रमशाळेत दिला जाणारा मध्यान्ह आहार किंवा पोषण आहार निकृष्ट दर्जाचा असल्याचं वारंवार समोर येतंय. पुण्याच्या घोडेगाव येथील निवासी आदिवासी आश्रम शाळेत धक्कादायक प्रकार समोर आलाय. विद्यार्थ्यांना नाश्यातमध्ये दिल्या जाणाऱ्या दुधात चक्क जिवंत अळ्या आढळून आल्यात. गंभीर बाब म्हणजे गेल्या दीड महिन्यांपूर्वी इथल्या विद्यार्थ्यांच्या जेवणात अळ्या आढळल्या होत्या. मात्र त्यातूनही प्रशासनानं धडा घेतला नाही. आता पुन्हा तसाच प्रकार घडल्यानं शिक्षण विभाग विद्यार्थ्यांची कशी क्रूर थट्टा करतंय हे स्पष्ट होतंय.

आश्रमशाळेतील या धक्कादायक घटनेनंतर यंत्रणा हादरली आहे. प्रकल्प अधिका-यांनीही अळ्या सापडल्याचं मान्य केलं आहे. अन्न व औषध प्रशासनाकडे नमुने पाठवले जाणार आहेत. ही एकमेव घटना नाही. गेल्या महिन्याभरात राज्यातील विविध शाळांमध्ये, आश्रमशाळांमध्ये निकृष्ट पोषण आहाराचे प्रकार समोर आले आहेत. नंदुरबार जिल्ह्यात शहादा तालुक्यातील मुबारकपूर येथील अंगणवाडीत बालकांच्या पोषण आहारात अळ्या आढळल्या होत्या.

सोलापूर जिल्ह्यात कासेगाव येथील भुसेनगरच्या अंगणवाडी मध्ये आणि धाराशिवच्या पाडोळी गावात पोषण आहारात चक्क मेलेला बेडूक आढळून आलाय. याशिवाय सांगलीमध्ये साप, नांदेडमध्ये अळ्या तर घाटकोपरमध्ये पोषण आहारात झुरळ आढळलं होतं. असे प्रकार घडल्यावरही केवळ कोरडी चौकशी करून थातूर मातूर कारवाई केली जाते. त्यामुळे मुलांचे बळी गेल्यानंतरच सुस्त यंत्रणेला जाग येणार का? असा संतप्त सवाल केला जातोय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update:बारामतीत जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचे आगमन; शारदा प्रांगणात मुक्काम

Palazzo Design for Monsoon: पावसाळ्या कम्फर्टेबल आणि स्टायलिश लूकसाठी ट्राय करा हे ७ ट्रेंडी पलाझो डिझाइन्स

AI TECH : लवकरच बाजारात येणार ChatGPT-पावर्ड स्मार्ट स्पीकर , AI Assistant ची लुटता येणार मज्जा

Maharashtra Rain : राज्यात अतिमुसळधार पावसाचा अंदाज, हवामान विभागाने सांगितला शब्द ना शब्द

Famous Cardiologist: प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉक्टरची आत्महत्या; कारमध्ये आढळला मृतदेह

SCROLL FOR NEXT