Pune Saam
मुंबई/पुणे

Pune News: गे डेटींग ॲपवर ओळख, भेटायला गेला; रात्रीच्या वेळी त्याच्यासोबत असं काही घडलं की..

Pune police crack down on gay dating app scam: पुण्यात गे डेटींग ॲपचा वापर करून तरूणांना सापळ्यात ओढून लुटणाऱ्या एका टोळीचा पर्दाफाश बंडगार्डन पोलिसांनी केला आहे.

Bhagyashree Kamble

सचिन जाधव, साम टीव्ही

पुण्यात एक धक्कादायक प्रकार घडला आहे. गे डेटिंग अॅपचा वापर करून लोकांना गंडवणाऱ्या आणि लुटणाऱ्या एका टोळीचा पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. या टोळीने आतापर्यंत ५० हून अधिक तरूणांना फसवले असल्याची माहिती आहे. या प्रकरणी पोलिसांनी एकूण ४ जणांना ताब्यात घेतलं आहे. या प्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्याचे पथक पुढील तपास करीत आहेत. तसेच पोलिसांनी सावध राहण्याचा इशारा दिला आहे.

फसवणुकीचा प्रकार कसा घडला?

या टोळीनं आधी पिंपरी परिसरातील तरूणाशी गे डेटींग अॅपवरून ओळख करून घेतली. त्यानंतर हे टोळी तरूणांना आरटीओ चौक, मंगळवार पेठ परिसरात बोलवून घ्यायचे. नंतर त्यांना मारहाण करून लुटमार करायचे. असे करत त्यांनी आतापर्यंत ५० हून अधिक तरूणांना फसवल्याची माहिती आहे.

टोळीने नुकतंच एका तरूणाला गे डेटींग अॅपवरून जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न केला. त्याला बोलावून घेतलं. तसेच त्याच्याकडून डेबिट कार्ड, मोबाईल फोन आणि गाडीची चावी हिसकावून घेतली. डेबिट कार्डचा पिन नंबर काढून घेतल्यानंतर, आरोपींनी एटीएममधून ९,५०० रूपये काढून घेतल्याची माहिती आहे. यानंतर तरूणाला जबर मारहाण केली.

या घटनेनंतर संबंधित तरूणाने धाडस दाखवत थेट पोलिसांकडे धाव घेतली. तरूणाने दाखल केलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी चारही आरोपींना अटक केली आहे. वाजीद रज्जाक उर्फ लालसाहब शेख (वय १९ ), महेबुब ऊर्फ गौस जावेद शेख (वय २०), श्रीनिवास उर्फ शिनु व्यकप्पा नायक (वय २२), सोहेल गफुर शेख (वय २४, सर्व रा. मंगळवार पेठ) अशी आरोपींची नावे आहेत. या प्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्याचे पथक तपास करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi vs Hindi Clash: परप्रांतीय व्यापारी मराठीच्या विरोधात मोर्चा; परप्रांतीयांमध्ये हिंमत येते कुठून?

Shocking : तरुणीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये प्लास्टिक बॉटल अडकली; क्षणिक सुखासाठी नको ते करुन बसली, डॉक्टरही चक्रावले

५ जुलैला महाविनाश? नवीन बाबा वेंगाच्या भविष्यवाणीचा धसका, महाप्रलयाला एक दिवस बाकी?

Operation Sindoor: पाक आणि चीनची डोकेदुखी वाढणार,अपाचे हेलिकॉप्टर, ठरणार शत्रूचा कर्दनकाळ, अमेरिका भारताला देणार 'AH-64E हेलिकॉप्टर'

सरकार देणार तुम्हाला मोफत फ्लॅट? अर्ज करण्यासाठी सरकारची नवी वेबसाईट? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

SCROLL FOR NEXT