PUNE GANGWAR: ANDEKAR GANG ATTACKS AKSHAY MHASKE IN REVENGE BID saam tv
मुंबई/पुणे

पुण्यात पुन्हा रक्तरंजित गँगवॉर; आंदेकर टोळीनं आरोपीच्या भावावर हल्ला का केला?

Pune Gangwar : पुण्यात पुन्हा रक्तरंजित गँगवॉर सुरु झालंय.वनराज आंदेकरच्या हत्या प्रकरणात आणखी एक हत्येचा प्रयत्न झालाय. या गँगवॉरची पार्श्वभूमी काय आहे? आंदेकर टोळीनं आरोपीच्या भावावर हल्ला का केलाय? पुणे पोलिसांचा कसा खुळखुळा झालाय? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून.

Suprim Maskar

  • पुण्यात आंदेकर-कोमकर टोळ्यांमधील संघर्ष पुन्हा उफाळला

  • अक्षय म्हस्केवर भरदिवसा गोळीबार आणि कोयता हल्ला

  • वनराज आंदेकर हत्या प्रकरणाच्या बदल्यात हल्ल्याचा संशय

पुण्यात पुन्हा एकदा रक्तरंजित गँगवॉरची सुरूवात झालीय. कारण आंदेकर आणि कोमकर गँग पुन्हा सक्रीय झाल्या आहेत. ((माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी आंदेकर टोळीने पुण्यात हत्येचा प्रयत्न केलाय)).वनराज आंदेकर खून प्रकरणातील मुख्य आरोपी आकाश म्हस्केचा सख्खा भाऊ अक्षय म्हस्के याची भरदिवसा भर चौकात गोळ्या झाडून आणि ((कोयत्याने वार करून बालाजीनगर परिसरात हत्येचा प्रयत्न करण्यात आला. आंदेकर टोळीनं हा हल्ला का केला ते पाहूयात...))

आकाश म्हस्केनं वनराज आंदेकरांच्या हत्येसाठी मध्य प्रदेशातून पिस्तुले आणि काडतुसे आणल्याचं तपासात समोर आलं होतं.. ज्यामुळे मकोकाअंतर्गत कारवाई करून आकाश म्हस्केची तुरुंगात रवानगी करण्यात आलीय. अशावेळी तुरुंगात आकाशला संपवणं शक्य नसल्यानं आंदेकर टोळीनं बदला घेण्यासाठी आकाशचा भाऊ अक्षय म्हस्केचा दिवसाढवळ्या खून करण्याचा प्रयत्न केला.

दरम्यान अक्षय म्हस्केच्या हत्येचा प्रयत्न कोमकर टोळीचा बदला घेण्यासाठी आंदेकर टोळीकडून झाल्याचा संशय आहे. गेल्या दोन वर्षांपासून आंदेकर आणि कोमकर गँगमध्ये कसं हत्या सत्र सुरू आहे ते पाहूयात. 1 सप्टेंबर 2024 ला नाना पेठ भागात बंडू आंदेकर यांचा मुलगा आणि माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांची कौटुंबिक वादातून आणि गुन्हेगारी वर्चस्वातून कोमकर टोळीनं हत्या केली.

त्यानंतर 5 सप्टेंबर 2025 ला वनराज आंदेकरच्या हत्येचा बदला म्हणून आंदेकर टोळीनं हत्येतील आरोपी गणेश कोमकर याचा मुलगा आयुष कोमकर यांची तब्बल 9 गोळ्या झाडून हत्या केली. तसचं 1 नोव्हेंबर 2025 ला आंदेकर हत्येतील आरोपी समीर काळेचा भाऊ गणेश काळेचीही गोळ्या झाडून हत्या केली. आणि आता आरोपी आकाशचा भाऊ अक्षय म्हस्केच्या खूनाचा प्रयत्न करण्यात आलाय.

पुण्यातील या गँगवॉरमुळे पुणेकरांमध्ये भीतीची वातावरण पसरलयं. गँगवॉरमुळे घरातून बाहेर कसं पडायचं? असा सवाल पुणेकर उपस्थित करतायत. आंदेकर टोळीने वनराज आंदेकरांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी आता थेट आरोपींच्या भावांना आणि मुलांना टार्गेट केलंय. या रक्ताच्या होळीमुळे पुणेकरांमध्ये प्रचंड दहशतीचं वातावरण पसरलंय. गुन्हेगारांना कायद्याचा आणि पोलिसांचा धाक उरलाय की नाही? गँगस्टरसमोर पुणे पोलिसांचा खुळखुळा झालाय का? असे अनेक गंभीर प्रश्न यानिमित्तानं निर्माण झाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

OBC क्रिमीलेअरची मर्यादा 15 लाख? राज्य सरकारचा केंद्राकडे नवा प्रस्ताव

Home Loan Calculator: घर खरेदीचा प्लॅन? 50000 पगारावर किती होम लोन मिळू शकतं? जाणून घ्या बँकेचं गणित...

Maharashtra Fuel Crisis: 24 तासात शेतकऱ्यांसाठी 25 टक्के पेट्रोल पंप राखीव करा; अन्यथा..., राष्ट्रवादी काँग्रेसचा सरकारला इशारा

Kalyan Crime: कल्याणमध्ये भरचौकात तरुणीसोबत अश्लील वर्तन, पोलिसांनी तासाभरात आरोपीला ठोकल्या बेड्या

Fact Check : सरकार म्हणतंय, एक वेळ जेवण सोडा? खरंच अमित शाहांनी विधान केलं? VIDEO

SCROLL FOR NEXT