pune gangster gaja marane mutton party Saam Tv News
मुंबई/पुणे

Gaja Marne : गजा मारणेला जेलमध्ये नेताना मटण पार्टी, ढाब्यावर 'ते' ३ लोकंही उपस्थित; VIDEO

Gangster Gaja Marane : कोथरूडमधील एका तरुणाला मारहाण केल्याप्रकरणी मारणेसह अन्य काही जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात मारणे टोळीवर मकोका लावण्यात आला आहे.

Prashant Patil

पुणे : पुण्यातील कुख्ख्यात गँगस्टर गजा मारणे गुन्हेगारी क्षेत्रात दहशत निर्माण करण्याचा त्याचा कायम प्रयत्न असतो. मात्र, पोलिसांनी अटक केल्यावर येरवडा कारागृहात स्थानिक गुंड, आरोपींसोबत राहणे त्याला कमीपणाचे वाटते. त्यामुळे त्याला येरवडा कारागृह नकोसं वाटत होतं. ही गोष्ट पोलीस आयुक्तांना समजल्यावर त्याला सांगली कारागृहातून पुन्हा येरवडा कारागृहात आणण्यात आलं, अशी माहिती वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने दिली.

महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्याअंतर्गत (मकोका) कारवाई करण्यात आलेला कुख्यात गजानन ऊर्फ गजा मारणेला येरवडा कारागृहातून सांगली कारागृहात घेऊन जाताना पोलिसांसमक्ष एका ढाब्यावर मारणे आणि त्याच्या साथीदारांची ‘मटण पार्टी’ झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकाराची गंभीर दखल पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी घेतली असून, त्या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या एक सहायक निरीक्षकासह चार पोलीस अंमलदारांचं निलंबन करण्याचा निर्णय आयुक्तांनी घेतला आहे.

कोथरूडमधील एका तरुणाला मारहाण केल्याप्रकरणी मारणेसह अन्य काही जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात मारणे टोळीवर मकोका लावण्यात आला आहे. ते सर्व आरोपी सध्या येरवडा कारागृहात आहेत. मात्र, पुणे पोलिसांनी एक महिन्यापूर्वी मारणे याला सांगली कारागृहात स्थलांतरित करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार गुन्हे शाखेचे एक पथक त्याला बंदोबस्तात सांगलीला घेऊन चालले होते. त्या वेळी हा धक्कादायक प्रकार घडला.

पोलिसांची वाहने पुण्यातून बाहेर पडताच त्यांच्या दोन फॉर्च्युनर, एक थार आणि अन्य एका गाडीने पाठलाग सुरू केला. पोलीस साताऱ्यात आल्यानंतर महामार्गावरील एका प्रसिद्ध ढाब्यावर थांबले. धाब्यावर कर्मचाऱ्यांनी जेवण केलं. त्यावेळी पोलिसांच्या पाठीमागून चार वाहनांतून आलेल्या व्यक्तीही तेथे दाखल झाल्या. त्या व्यक्ती मारणेचे समर्थक, कार्यकर्ते असल्याचे स्पष्ट झालं. त्यामध्ये पोलिस रेकॉर्डवरील काही सराईत गुन्हेगारांचाही समावेश होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

Maharashtra Politics : मुंबईत होणार मराठीची एकजूट; ठाकरेंची युती, महायुतीला धडकी? Video

Ladki Bahin Yojana: महिलांना कधी मिळणार जूनचा हप्ता? आदिती तटकरेंनी थेट तारीखच सांगितली

SCROLL FOR NEXT