Pune Ganeshutsav  x
मुंबई/पुणे

Pune Ganeshutsav : पुण्यातील गणपती विसर्जन मिरवणुकीबाबत पोलिसांचा मोठा निर्णय

Pune : गणेश विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी मोठा निर्णय घेतला आहे. विसर्जन मिरवणुकीत आता ढोल ताशा पथकांच्या संख्येवर सक्ती राहणार नसल्याचे पुणे पोलिासांनी स्पष्ट केले आहे.

Akshay Badve

  • विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांचा निर्णय

  • विसर्जन मिरवणुकीत आता ढोल पथकांच्या संख्येवर सक्ती नाही

  • पथकांची संख्या व पथकामधील सदस्यांची संख्या यावर सक्ती केली जाणार नसल्याचे पुणे पोलिसांनी केलं स्पष्ट

Pune Ganeshotsav : पुण्यात अनंत चतुर्दशीच्या तयारीला सुरुवात झाली आहे. अशात पुण्यातील वादकांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. पुण्यात ढोल ताशा पथकांच्या संख्येवर सक्ती न करण्याचा निर्णय पुणे पोलिसांनी घेतला आहे. विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. पथकांची संख्या व पथकामधील सदस्यांची संख्या यावर सक्ती केली जाणार नसल्याचे पुणे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. गणेश मंडळांना ढोल पथके लावण्याच्या परवानगीबाबत अखेर पेच मिटला आहे.

गेल्या काही दिवसांपासून पुण्यात विसर्जन मिरवणुकी दरम्यान गणेश मंडळांनी किती ढोल ताशा पथक लावायचे याबाबत प्रश्न उपस्थित केला जात होता. ढोल ताशा पथकांवर मर्यादा यावी अशी मागणी विविध स्तरातून केली जात होती. मानाचे गणपती तसेच शहरातील इतर प्रमुख गणेश मंडळाच्या विसर्जन मिरवणुकीमध्ये ढोल ताशा पथकांच्या संख्येवर तसेच वादकांच्या सदस्य संख्येवर निर्बंध यावेत अशी सुद्धा मागणी अनेकांनी केली होती. याविषयी ढोल ताशा महासंघ तसेच शहरातील प्रमुख ढोल ताशा पथकांची आणि पुणे पोलिसांची अनेक वेळा बैठक सुद्धा झाली. काल झालेल्या बैठकीनंतर ढोल ताशा महासंघाकडून आणि इतर ढोल ताशा पथकाकडून विसर्जन मिरवणुकीत ढोल ताशा पथकांच्या संख्येवर आणि सदस्य संख्येवर मर्यादा आणल्यामुळे नाराजी व्यक्त करण्यात आली होती.

आज पुन्हा एकदा पुणे पोलिसांनी पुण्यातील ढोल ताशा पथकांसह महासंघ प्रतिनिधी सोबत चर्चा केली आणि हा निर्णय मागे घेण्यात आला. त्यामुळे येथे शनिवारी होणाऱ्या विसर्जन मिरवणुकीत गणेश मंडळांच्या समोर तसेच ढोल ताशा पथकांसमोर असलेला तिढा अखेर सुटला आहे.

गणपती विसर्जन दरम्यान ढोल ताशा पथकाची संख्या व त्यामध्ये सदस्यांचे संख्या बद्दल काही मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे. या विषयावर सर्वांगीण विचार करून असा निर्णय घेण्यात आला आहे की जो पर्यंत गणपती मंडळ ठरलेले वेळेचे पालन करतील तोपर्यंत पुणे पोलीस यांचे कडून पथकांचे संख्या व पथकामधील सदस्यांची संख्या यावर सक्ती केली जाणार नाही, अशी माहिती सह आयुक्त रंजन कुमार शर्मा यांनी दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chunar Teri Sarke : वाईट शब्द, घाणेरडा डान्स; बॉलिवूडमधील १० अश्लील गाणी, ऐकून येईल चिड

Maternity Leave: मुलांना दत्तक घेतलेल्या महिलांनाही मिळणार मॅटर्निटी लिव्ह, सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय

IPL 2026 injury update: IPL सुरू होण्याआधीच मोठा धक्का, स्टार खेळाडू दुखापतीमुळे बाहेर पडण्याच्या मार्गावर

DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! महागाई भत्ता इतक्या टक्क्यांनी वाढणार; महत्त्वाची अपडेट समोर

Maharashtra Live News Update : नागपुरात वीजकेंद्रांना ड्रोन हल्ल्याची धमकी, प्रशासनात खळबळ

SCROLL FOR NEXT