Pune Ganesh Visarjan x
मुंबई/पुणे

Pune : पुण्यात विसर्जनानंतर मूर्तींचे छायाचित्रण आणि प्रसारणास मनाई; प्रशासनाचा आदेश, उल्लंघन केल्यास...

Pune Ganesh Visarjan : पुण्यात गणेश विसर्जनानंतर गणरायाच्या मूर्तींचे छायाचित्रण आणि प्रसारण करण्यास मनाई करण्यात आली आहे. या संबंधित आदेश पुणे प्रशासनाने जारी केले आहेत.

Yash Shirke

  • गणेश विसर्जनानंतर मूर्तींचे छायाचित्रण व प्रसारणास मनाई

  • पुणे प्रशासनाने जारी केले महत्त्वाचे आदेश

  • आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाणार

अक्षय बडवे, साम टीव्ही, प्रतिनिधी

Pune Ganeshutsav : अनंत चतुदर्शीला अवघे दोनच दिवस उरले आहेत. या अनुषंगाने प्रशासनाने तयारीला सुरुवात केली आहे. पुणे आणि आसपासच्या परिसरात गणेश विसर्जनाच्या हिशोबाने जय्यत तयारी सुरु झाली आहे. यादरम्यान पुणे प्रशासनाने गणेश विसर्जनानंतर गणरायाच्या मूर्तींचे छायाचित्रण आणि प्रसारण करण्यास मनाई केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यामध्ये गणेश विसर्जनानंतर मूर्तीचे छायाचित्रण व प्रसारणास बंदी असल्याचे जाहीर केले आहे. विसर्जनानंतर कृत्रिम तलाव, हौद, नदीमधील तरंगत्या किंवा अर्धवट तरंगत्या त्याव्यतिरिक्त संकलित केलेल्या मुत्यांचे छायाचित्रण करण्यास मनाई असल्याचे आदेश पुणे प्रशासानाने जारी केलेले आहेत.

गणरायाच्या विसर्जनादरम्यान धार्मिक भावना दुखावतील असे कृत्य करण्याचा आणि सार्वजनिक शांतता भंग पावेल अशी छायाचित्रे अथवा चलचित्रे समाजमाध्यमांवर प्रकाशित किंवा प्रसारित करण्यास मनाई असल्याचे पुणे प्रशासनाचे आदेश आहेत. पुणे शहरात हा आदेश लागू करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

पुणे शहरात विसर्जनानंतर गणेश मूर्तींचे छायाचित्रण, त्यांचे प्रकाशन आणि प्रसारण यावर बंदी घालण्यात आली आहे. या आदेशांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाणार असल्याचेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे. अनंत चतुर्दशीच्या दिवशी कोणाच्याही धार्मिक भावना दुखावू नये असे प्रशासनाचे उद्दिष्ट आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime News : "विरोधी पार्टीचे स्टेट्स" ठेवल्याचा राग, पुण्यात मित्रांनीच केला मित्राचा घात

Maharashtra News Live Update: यवतमाळमध्ये मोकाट जनावरांमुळे 2 कारमध्ये भीषण अपघात, एकाचा मृत्यू

ममता बॅनर्जींचा भाजपला जोरदार धक्का; बार कौन्सिलच्या निवडणुकीत पराभव, फक्त ३ जागांवर विजय

NEET Paper Leak Case: नीट पेपर फुटीप्रकरणावरून सुप्रीम कोर्ट संतापले, एनटीएच्या कार्यक्षमतेवर उपस्थित केले सवाल

Ladki Bahin Yojana : मोठी बातमी ई-केवायसीनंतर 'लाडकी बहीण' योजनेतील १ कोटी लाभार्थ्यांचा ₹१५०० चा हप्ता बंद, महत्त्वाची अपडेट समोर

SCROLL FOR NEXT