Ganpati Visrjan Pune Mirvnuk Pune Saamtv
मुंबई/पुणे

Ganpati Visrjan Pune: ९ हजार कर्मचारी तैनात, सीसीटीव्ही, ड्रोनद्वारे ठेवणार लक्ष... बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीसाठी पुणे पोलीस सज्ज!

Ganpati Visrjan Pune Mirvnuk Pune: गर्दीचा उच्चांक मोडणाऱ्या विसर्जन मिरवणुकीसाठी पुणे पोलीस दल सज्ज झाले आहे..

Gangappa Pujari

अक्षय बडवे, प्रतिनिधी

Pune Ganpati Visrjan Mirvnuk 2023:

गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेला गणेशोत्सवाचा जल्लोष आता अखेरच्या टप्प्यावर आला आहे. गुरूवार (२८, सप्टेंबर) ला गणपतीचे विसर्जन होणार आहे. दरवर्षीप्रमाणे गणपती बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीसाठी पुण्यातील गणेश मंडळांनी जय्यत तयारी केली असून पोलीस प्रशासनही सज्ज झाले आहे.

दरवर्षीप्रमाणे यंदाही पुण्यात गणपती विसर्जन मिरवणुकीचा (Ganapati Visrjan Pune) जल्लोष आणि उत्साह पाहायला मिळणार आहे. गर्दीचा उच्चांक मोडणाऱ्या या विसर्जन मिरवणुकीसाठी पुणे पोलीस (Pune Police) दलानेही मोठा बंदोबस्त ठेवण्याचे नियोजन केले असून पोलीस दलही विसर्जन मिरवणुकीसाठी सज्ज झाले आहे.

कसा असेल बंदोबस्त...

गणेश विसर्जन मिरवणुक काळात शहरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. सोनसाखळी चोरी आणि महिलांची छेडछाड रोखण्यासाठी पोलिस पथके, लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांच्या मदतीसाठी ४० पोलिस मदत केंद्र तसेच संशयितांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी मिरवणूक मार्गांवर २०५ सीसीटीव्हींची नजर असणार आहे.

शहरात विसर्जन मिरवणूक काळात 6 हजार 827 पोलीस कर्मचारी, 950 होमगार्ड, राज्य राखीव दलाच्या २ तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. तसेच या बंदोबस्तावर नियंत्रण ठेवण्यासाठी १ पोलीस आयुक्त, १ सहाय्यक पोलीस आयुक्त, १० पोलीस उपायुक्त, 155 पोलिस निरीक्षक तसेच 578 सहायक निरीक्षक आणि उपनिरीक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Co-Ords Sets Dress For Women: दिवाळीनिमित्त महिलांसाठी को-ऑर्ड सेट ड्रेसचे लेटेस्ट 5 पॅटर्न्स

बडतर्फ पोलीस अधिकारी निघाला दरोडेखोर; कारागृहातच शिजवला SBI लुटीचा कट

दिल्लीत 'इंडिया'-भाजप आमनेसामने; रामलीलावर इंडिया आघाडीचा महामोर्चा

महादेव बेटिंगचा किंग अखेर भारतात! CBI ची मोठी कारवाई! आता होणार मोठे खुलासे?

मंत्री पंकजा मुंडे बनल्या मॉडेल! पंकजाताईंचा रॅम्प वॉक पाहिला का?

SCROLL FOR NEXT