Online Order Fraud Pune Saamtv
मुंबई/पुणे

Pune Fraud News: ऑनलाईन ऑर्डरमध्ये बंद मोबाईल अन् साबण... फ्लिपकार्टचे कर्मचारीच घालत होते ग्राहकांना गंडा; चौघांना अटक

Online Order Fraud: कुरियर कंपनीचे कर्मचारी तो बॉक्स मोबाईल दुकानदाराला देताना त्यात जुना बंद पडलेला मोबाईल, फरशीचा तुकडा किंवा साबण ठेवून देत होते.

Gangappa Pujari

अक्षय बडवे, प्रतिनिधी...

Pune Fraud News: ऑनलाईन मागवलेल्या मोबाईलच्या पॅकिंग बॉक्समध्ये बंद पडलेला मोबाईल किंवा साबण ठेवून ग्राहकांची फसवणूक होत असल्याचा प्रकार पुण्यातून समोर आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे फ्लिपकार्टचे कर्मचारीच ग्राहकांना गंडा घातल होते. या प्रकरणात पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने चार जणांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून ४.५ लाख रुपये किमतीचे १९ मोबाईल जप्त करण्यात आले आहेत.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, पुण्यामधील (Pune) एका मोबाईल दुकान मालकाने ७.५ लाख रुपयांची फसवणूक झाल्याची तक्रार दिली होती. पोलिसांनी या घटनेचा तपास करत असताना अनेक ग्राहक बड्या कुरियर कंपन्यांमार्फत मोबाईल खरेदी करतात.

तसेच त्या कुरियर कंपन्या मोबाईल दुकानात ऑर्डर नोंदवून ग्राहकांना मोबाईल घरपोच देत असल्याचे समोर आले.याच माहितीच्या आधारे पोलिसांनी एक कुरियर कंपनी गाठली. त्या कुरियर कंपनीचे चार कर्मचारी तो बॉक्स मोबाईल दुकानदाराला देताना त्यात जुना बंद पडलेला मोबाईल, फरशीचा तुकडा किंवा साबण ठेवून देत होते.

पोलिसांनी या प्रकरणात अधिक तपास करत या कंपनीतील चार कर्मचाऱ्यांना अटक केली. या कारवाईमध्ये आरोपींच्या ताब्यातून ४.५ लाख रुपये किमतीचे विविध कंपनीचे १९ मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. चक्क फ्लिपकार्टचे (FlipCart) कर्मचारीच ग्राहकांची फसवणूक करत असल्याचा प्रकार समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune News : पुण्यात भाजपला धक्का! बड्या नेत्याचा काँग्रेसमध्ये प्रवेश, राजकारणात मोठी घडामोड

फालतू भानगडी करताय! भाजपला संपवायला निघाले का? सुधीर मुनगंटीवारांची ऑडिओ क्लिप व्हायरल

Weather Update: ११ राज्यांवर पावसाचं संकट! वादळी वारे अन् विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा

मुंबईत तरुण-तरुणीला बेदम मारहाण; अल्पवयीन गार्डन गँगचा धुडगूस

जमिनीच्या व्यवहारांवर ITची नजर; 2 लाखांवरील रोखीचे व्यवहार रडारवर

SCROLL FOR NEXT