pune Women corporator rape  Saam TV
मुंबई/पुणे

Pune News: पुण्यात माजी नगरसेविकेवर अत्याचार; फोटो व्हायरल करण्याची धमकी देत १० लाख रुपये उकळले

Pune Women Corporator Rape: मैत्रीपूर्ण संबंधातून काढलेले फोटो व्हायरल करण्याची धमकी देत पुण्यात माजी नगरसेविका बलात्कार करण्यात आला आहे.

Satish Daud

सचिन जाधव, साम टीव्ही

Pune Women Corporator Rape

विद्येचं माहेरघर आणि शांतताप्रिय शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे शहरात गुन्हेगारीच्या घटनेत दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे पुण्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. एकीकडे पोलीस गुन्हेगारांवर कारवाई करत असताना दुसरीकडे एक खळबळजनक घटना समोर आली आहे. (Latest Marathi News)

मैत्रीपूर्ण संबंधातून काढलेले फोटो व्हायरल करण्याची धमकी देत पुण्यात माजी नगरसेविका बलात्कार करण्यात (Crime News) आला आहे. याप्रकरणी पर्वती पोलीस स्टेशनमध्ये आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सचिन असं गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

गुन्हा दाखल होताच पोलिसांनी (Police) आरोपीला अटक केली आहे. या घटनेनं शहरात मोठी खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि पीडित माजी नगरसेविकेचे मैत्रीपू्र्ण संबंध होते. याच मैत्रीचा फायदा घेत सोशल मीडियावर फोटो, व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली.

इतकंच नाही, तुझ्या पतीला फोटो दाखवेल, अशी धमकी दे आरोपीने पीडित महिलेवर वारंवार बलात्कार केला. २०१७ पासून हा प्रकार सुरू होता. यादरम्यान आरोपीने पीडितेला धमकावून १० लाख रुपये उकळल्याची धक्कादायक माहिती देखील पोलीस तपासात समोर आली आहे.

दरम्यान, आरोपीकडून वारंवार होणाऱ्या लैंगिक शोषणाला कंटाळून पीडित नगरसेविकेने पोलिसांत धाव घेतली. याप्रकरणी पीडितेने दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी सचिन याच्याविरोधात गुन्हा दाखल केला असून त्याला अटक देखील केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kidney problems: हे 1 साधं लक्षण दिसलं तर समजा लवकरच किडनी होणारे खराब, हळूहळू पोखरतं शरीर

Maharashtra News Live Update:नवीन पाणीपुरवठा योजनेत मनपावर ३०० कोटींचा अतिरिक्त भार; टप्पे कमी करण्याचे नियोजन

Petrol-Diesel Price Hike: CNG आणि LPG महागले! मग पेट्रोल-डीझेल स्वस्त की महाग? आजचे नवीन दर जारी, पाहा तुमच्या शहरातील भाव

India : भगवान शंकराचं अनोखं मंदिर! जेथे शिवलिंगावर अखंड पडत राहतं गंगाजल, जाणून घ्या कुठे आहे लोकेशन

Besan vs Milk for Face: चेहऱ्यासाठी बेसन की दूध, काय लावणे अधिक फायदेशीर आहे?

SCROLL FOR NEXT