Pune Sex Racket Busted Saam Tv
मुंबई/पुणे

Pune : लॉजच्या बंद रूममध्ये मुली नको त्या अवस्थेत, पोलिसांनी छापा टाकताच उघडं पडलं सेक्स रॅकेट; पुण्यातील घटना

Pune Sex Racket Busted : पुण्यातील आंबेगाव बुद्रुक परिसरात गुन्हे शाखेने केलेल्या कारवाईत कथित वेश्याव्यवसाय उघडकीस आला. चार महिलांची सुटका करण्यात आली असून एका एजंटला अटक करण्यात आली आहे.

Alisha Khedekar

  • आंबेगाव बुद्रुकमध्ये सेक्स रॅकेट उघडकीस

  • चार महिलांची सुरक्षित सुटका

  • एका एजंटला पोलिसांनी अटक केली

  • बनावट ग्राहकाच्या मदतीने कारवाई यशस्वी

  • पुढील तपासात आणखी आरोपींचा शोध सुरू

सागर आव्हाड, पुणे

पुण्यातील आंबेगाव बुद्रुक परिसरात सुरू असलेल्या कथित वेश्याव्यवसायावर गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाने धाड टाकत मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत चार पीडित महिलांची सुटका करण्यात आली असून एका एजंटला अटक करण्यात आली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सचिन बाबुराव गायकवाड (वय २८, रा. कोंढवा, पुणे) या व्यक्तीला या प्रकरणात अटक करण्यात आली आहे. तो महिलांना लॉजमध्ये आणून त्यांच्याकडून जबरदस्तीने वेश्याव्यवसाय करून घेत असल्याचा आरोप आहे. गुन्हे शाखेला याबाबत गोपनीय माहिती मिळाल्यानंतर त्यांनी तातडीने कारवाईची योजना आखली.

पुणे-सातारा रस्त्यावरील “द्वारका लॉजिंग अ‍ॅण्ड बोर्डिंग” येथे हा प्रकार सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस निरीक्षक छगन कापसे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तयार करण्यात आले. या पथकाने प्रथम माहितीची खात्री करण्यासाठी बनावट ग्राहक पाठवला. खात्री झाल्यानंतर पोलिसांनी अचानक छापा टाकत संपूर्ण लॉजची झडती घेतली. या कारवाईदरम्यान लॉजमध्ये ठेवण्यात आलेल्या चार महिलांची सुटका करण्यात आली.

पोलिसांनी तत्काळ त्यांना सुरक्षित स्थळी हलवून आवश्यक वैद्यकीय तपासणी प्रक्रिया सुरू केली आहे. तसेच आरोपी सचिन गायकवाड याला ताब्यात घेऊन पुढील चौकशी सुरू करण्यात आली आहे. पोलिसांच्या तपासात आरोपी मूळचा लातूर जिल्ह्यातील उमरगा तालुक्यातील मुळज गावचा असल्याचे समोर आले आहे. तो काही काळापासून पुण्यात वास्तव्यास असून या अवैध व्यवसायात सक्रिय असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

या प्रकरणी आंबेगाव पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमे तसेच अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध अधिनियम १९५६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून या रॅकेटमागील इतर आरोपींचा शोध घेतला जात असून, या प्रकरणाचा तपास अधिक व्यापक करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raigad News: रायगडावर फिरण्यासाठी गेला, ८०० फूट खोल दरीत मृतदेह आढळला; मुंबईच्या तरुणासोबत काय घडलं?

Bullet Train: अबब! 12 मजली इमारती इतका उंच अन् 480 मीटर लांब; बुलेट ट्रेनसाठी साबरमती नदीवर उभारला भव्य पूल, काय आहे पुलाची खासियत? वाचा

Maharashtra News Live Update: ठाण्यातील पुर्णेकर हत्या प्रकरणावरून आता आगरी समाज आक्रमक

Copper Utensils : धनतेरसपूर्वी तांबे-पितळाची भांडी घेताय? शुद्धता ओळखण्यासाठी या ट्रिक येतील कामी

Rice Water Benefits for Skin : चेहऱ्यावर तांदळाचे पाणी लावल्याने होतात ‘हे’ 5 चमत्कारिक फायदे; काळे डाग अन् सुरकुत्या होतील गायब

SCROLL FOR NEXT