Bus Saam Tv News
मुंबई/पुणे

Pune News: बस चालकाचा प्रताप! दारू पिऊन चालवत होता बस; तरूणाला चिरडलं आणि मग..

Pune road accident News: पुण्यात मद्यधुंद बस चालकाने एका दुचाकीस्वाराला उडवलं आहे. ही घटना रात्रीच्या सुमारास घडली आहे. यात तरूणाच्या डोक्याला जबर मार बसलाय.

Bhagyashree Kamble

पुण्यात मद्यधुंद बस चालकाने एका दुचाकीस्वाराला उडवलं आहे. ही घटना रात्रीच्या सुमारास घडली आहे. पीएमपीएल बस चालक मद्यधुंद अवस्थेत होता. अचानक समोर दुचारी आली. मद्यधुंद अवस्थेत बस चालकानं दुचाकी स्वाराला चिरडलं. तरूणीच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याची माहिती आहे. उपचारासाठी खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

पुण्यातील बस चालकानं एका दुचाकीस्वाराला चिरडल्याची माहिती समोर आली आहे. ही बस वाघोलीच्या दिशेनं जात होती. रात्रीच्या सुमारास बस चालक मद्यपान करून आला असल्याची माहिती आहे. पीएमपीएलचा तो बस चालक होता. बससमोर अचानक दुचाकीस्वार आला.

पीएमपीएल बसची दुचाकीला जबर धडक बसली. मद्यधुंद अवस्थेत असलेल्या बस चालकानं दुचाकी चालवत असलेल्या तरूणाला उडवलं. या अपघातात तरूण गंभीर जखमी झाला आहे. डोक्याला त्याच्या गंभीर दुखापत झाली आहे. त्याला तातडीनं खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

गंभीर जखमी असलेल्या तरूणावर खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे. या अपघात घटनेनंतर बस चालकाची पोलिसांकडून चौकशी सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Smit Machhar : मुंबईचा कॅप्टन स्मित मच्छार ठरला देवदूत! जीव धोक्यात घालून १७४ प्रवाशांचे प्राण वाचवले; नेमकं काय घडलं?

Rajpal Yadav Viral Video: 'तुम्हाला बाहेर जावं लागेल...'; मुश्ताक खान यांच्या शोकसभेतून राजपाल यादवला खरंच बाहेर काढलं?

Maharashtra News Live Update: प्रदीप पुर्णेकर हत्या प्रकरण; ठाणे क्राईम ब्राँचकडून ३ महिला ताब्यात

Phone overheating: फोन वारंवार गरम होत असेल तर काय करावं?

Congress: काँग्रेस भवनाबाहेर आढळला महिला नेत्याच्या नवऱ्याचा मृतदेह, डोक्यात गोळी घुसल्याने मृत्यू

SCROLL FOR NEXT