शिक्षणाचं माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यातून एक धक्कादायक ड्रग्स रॅकेट उघडकीस आलं आहे. वारजे आणि उत्तमनगर परिसरात ‘पोर्टर’ या डिलिव्हरी ॲपच्या माध्यमातून अमली पदार्थांची विक्री केली जात असल्याची माहिती समोर आली असून, यामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.
पुणे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रेकॉर्डवरील गुन्हेगार सुनील राठोड याच्याकडून या ड्रग्स रॅकेटचा पर्दाफाश झाला. अपहरणाच्या गुन्ह्यात तो पोलिसांना हवा होता. त्याला अटक केल्यानंतर चौकशीदरम्यान तो अमली पदार्थांची विक्री करत असल्याचे समोर आले. यानंतर पोलिसांनी अधिक तपास सुरू करत या प्रकरणातील आणखी तीन आरोपींना अटक केली आहे.
राजन नायर, शुभम दहीभाते आणि जतिन कदम अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. या प्रकरणात आणखी चार आरोपींचा शोध सुरू आहे.
या आरोपींकडून ‘एमडी’ (मेफेड्रोन) या अमली पदार्थाचा साठा जप्त करण्यात आला आहे. विशेष म्हणजे हे आरोपी ग्राहकांपर्यंत ड्रग्स पोहोचवण्यासाठी ‘पोर्टर’ या डिलिव्हरी ॲपचा वापर करत होते. या पद्धतीमुळे पोलिसांच्या नजरेत न येता सहजपणे ड्रग्सची डिलिव्हरी केली जात होती.
तपासादरम्यान धक्कादायक माहिती समोर आली असून, गेल्या काही महिन्यांत या आरोपींनी तब्बल ३०० हून अधिक व्यवहार केल्याचं समजतंय. यामध्ये सुमारे ३०० जणांना या रॅकेटद्वारे अमली पदार्थांचा पुरवठा करण्यात आला असण्याची शक्यता आहे.
करत असताना पोलिसांना हा धागा सापडला. संशयित आरोपीच्या घराची झडती घेतली असता, त्याठिकाणी एमडी ड्रग्सची दोन पॅकेट आढळून आली. त्यानंतर सखोल चौकशीतून संपूर्ण रॅकेट समोर आले.
या प्रकरणामागे मोठं जाळे कार्यरत असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. गुन्हे शाखेसह उत्तमनगर पोलिस या प्रकरणाचा संयुक्त तपास करत असून, आणखी आरोपी समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.