Devendra Fadnavis Latest Speech Saam Tv
मुंबई/पुणे

Devendra Fadnavis Latest Speech : 'उद्धव यांना कोणी सांगत नाही, पोपट मेलाय,' फडणवीसांनी थेट पुण्यातून डागली तोफ

'उद्धव यांना कोणी सांगत नाही, पोपट मेलाय,' फडणवीसांनी थेट पुण्यातून डागली तोफ

Satish Kengar

Devendra Fadnavis Latest Pune Speech : ''उद्धव ठाकरेंना कोणी सांगत नाहीये की, पोपट मेला. कोर्टात केलेल्या ८ मागण्या मधील एकही मागणी मान्य झाली नाही'', सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. पुण्यात भाजपच्या कार्यकारिणीची बैठक झाली. यावेळी कार्यकर्त्यांना संबोधित करताना ते असं म्हणाले आहेत.

Devendra Fadnavis Pune Speech : काय म्हणाले फडणवीस?

उद्धव ठाकरे यांना लक्ष्य करत देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ''सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर महाराष्ट्रातील सरकारवर जे प्रश्नचिन्ह उपस्थित करत होते. ते शांत होतील, असं मला वाटलं होतं. मात्र दुर्दैवाने राजाचा एखाद्या गोष्टीसाठी जसा आग्रह असतो. त्याच प्रमाणे त्याची प्रजा, त्याची सेना त्याला सांगत असते. त्यामुळे राजाचा आवडता पोपट मेला, हे कोणी त्याला सांगत नाही. तसेच उद्धव ठाकरे यांना हे कोणी सांगायला तयार नाही की, उद्धवजी पोपट मेलाय.'' (Latest Marathi News)

Devendra Fadnavis On Karnataka Election Results : 'महाराष्ट्रात पुन्हा भाजपचे सरकार येणार'

कर्नाटकमधील पराभववर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ''महाराष्ट्रात पुन्हा भाजपचे सरकार येणार आहे. कर्नाटकमधील भाजपच्या पराजयाची चर्चा होत आहे. मात्र ज्यांची एक जागा निवडूण आली नाही. ते बडवत आहेत, ज्यांच्या घरी पोरगा झाला नाही ते देखील आनंद साजरा करत आहेत.''

Devendra Fadnavis On Modi : 'महाराष्ट्रात एकच पॅटर्न चालेल मोदी पॅटर्न'

फडणवीस पुढे म्हणाले की, ''महाराष्ट्रात एकच पॅटर्न चालेल मोदी पॅटर्न आणि भाजप पॅटर्न. भाजप आणि शिवसेनेची युती भक्कम आहे. आपला निवडून येण्याचा फार्म्युला मोदीजींची कार्यशैली, सामान्यांच्या विकासाचा आपला नरेटीव्ह आहे.''

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raj Thackeray: राज ठाकरेंबाबात वादग्रस्त पोस्ट, पुण्यात मनसैनिक आक्रमक; पाहा VIDEO

Maharashtra Live News Update: सिंधुदुर्ग जिल्ह्यात पुढील 3 ते 4 तासांसाठी रेड अलर्ट

Karnatak Mangaluru Bus Accident : दोन भरधाव बस एकमेकांना धडकल्या; अपघाताचा थरार कॅमेऱ्यात कैद,१४ विद्यार्थी गंभीर जखमी

Bala Nandgaonkar : 'उद्धव ठाकरे आणि साहेबांनी आता एकत्र यावं', बाळासाहेबांच्या सैनिकाचे भावनिक उद्गार

Rinku Rajguru: हातात टाळ, डोक्यावर तुळस; रिंकू राजगुरू विठुरायाच्या भक्तीत तल्लीन

SCROLL FOR NEXT