Pune-Daund Distance Saam TV
मुंबई/पुणे

Pune-Daund Distance: पुणे-दौंड प्रवास होणार आणखी वेगवान; रेल्वे प्रशासनाने घेतला मोठा निर्णय

Pune-Daund Distance: पुण्याहून रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. पुणे ते दौंड रेल्वेप्रवास आता आखणीच वेगवान होणार आहे.

Satish Daud

Pune To Daund Distance: पुण्याहून रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. पुणे ते दौंड रेल्वेप्रवास आता आखणीच वेगवान होणार आहे. या मार्गावर ताशी १३० किलोमीटर वेगाची मंजूरी प्रशासनाने दिली आहे. रेल्वे प्रशासनाकडून पुणे-दौड दरम्यान अनेक तांत्रिक चाचण्या करण्यात आल्या. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे रेल्वे प्रवास १० मिनिटांनी कमी होणार आहे. (Latest Marathi News)

रेल्वेने (Pune Railway) वेगमर्यादा वाढवल्याने एक्सप्रेस आणि मेमु ट्रेन्सला मोठा फायदा होणार आहे. मागील काही दिवसांपासून पुणे-दौंड रेल्वे मार्गावर अनेक कामे होत होती. रेल्वे प्रशासनाकडून या मार्गावरील रुळांची क्षमता वाढवली गेली.

त्यानंतर अधिकाऱ्यांनी या मार्गाची तांत्रिक तपासणी केली. त्यानंतर त्यात पुन्हा काही बदल करण्यात आले. दरम्यान, पुणे रेल्वे प्रशासनाने (Indian Railway) काही बदल केले गेले. त्यानंतर या मार्गावर रेल्वे गाड्यांचा वेग वाढवण्यास परवानगी देण्यात आली.

आता पुणे-दौंड दरम्यान ताशी १३० किलोमीटर वेगाने रेल्वे धावणार आहे. यासंदर्भातील आदेश मध्य रेल्वेने काढले आहेत. या रेल्वेगाड्या आजपासून म्हणजेच सोमवारपासून १३० किमी प्रतितास या वेगाने धावणार आहेत.

यामुळे वेळेची बचत होणार आहे. हा निर्णय सर्व प्रवासी गाड्यांना लागू असेल. दुसरीकडे दौंड मार्गावरून धावणारी पुणे-अमरावती विशेष गाडी आता नियमित करण्यात आली आहे. यामुळे या गाडीसाठी लागणारे विशेष गाडीचे भाडे रद्द केले गेले. कोरोना काळात या गाडीला विशेष गाडीचा दर्जा दिला होता.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anagha Atul: आधीच कट्यार त्यात जीवघेणी धार...

Ganpati Decoration Video: फुलांच्या माळा अन् रंगीबेरंगी पडदे; अवघ्या अर्धा तासात सजेल गणरायाचं मखर Video

Maharashtra Live News Update : शिवसेना शिंदे गटाचे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम करणार भाजपमध्ये प्रवेश...

Lenyadri Caves History: वास्तुकला आणि सांस्कृतिक वारसा, जुन्नरमधील लेण्याद्री लेण्यांचे वैशिष्ट्ये जाणून घ्या

Lonavala Crime : मुसळधार पावसात चोरट्यांनी साधला डाव; लोणावळ्यात दोन ठिकाणी चोऱ्या, सहा लाखाचा ऐवज लांबविला

SCROLL FOR NEXT